Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरकोरपना तालुक्यातील धानोली येथील महिला बचत गटाने केला मंगी (बु) येथे अभ्यास...

कोरपना तालुक्यातील धानोली येथील महिला बचत गटाने केला मंगी (बु) येथे अभ्यास दौरा

कोरपना प्रतिनिधी
राजुरा तालुक्यातील ग्राम पंचायत , मंगी (बु.) हे एक विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. ही बाब ग्रामस्थांना जाणवू लागली.

मंगी (बु.) गावाच्या विकास कामाचा अभ्यास करण्यासाठी अंबुजा सिमेंट फाउन्डेशनच्या माध्यमातून धानोली या गावातील बचत गटाच्या महिलांनी मंगी (बु) येथे भेट देवून गावाच्या श्रमदानाची व विकास कामाची पाहणी केली. जिल्हा परिषद शाळेत सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ग्राम पंचायतचे सरपंच सौ. रसिकाताई पेंदोर, उपसरपंच श्री. वासुदेवजी चापले, अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे व्यवस्थापक श्री. श्रीकांतजी कुंभारे, श्री. जितेंद्र बैस, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष श्री. परशुराम तोडासाम ( मुख्याध्यापक मंगी खु ), शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अंबादासजी जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाशजी वेडमे, माजी जि.प.सदस्य श्री. भिमरावजी पुसाम, पोलीस पाटील या गावातील सरपंच आणि सदस्य यांची बैठक घेण्यात आली, अनेक महिलांनी यांनी स्मार्ट ग्राम तयार होण्याचा प्रवास कसा झाला हे सांगताना सन 2012 पासून ग्रामस्थ व युवकांनी सातत्याने दररोज पहाटे 5 वाजता पासून 2 तास ग्राम स्वच्छतेसाठी श्रमदान करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर अभ्यास दौऱ्यातून पाहणी करतांना स्वच्छता पाहून तर भाराहून गेले आणि संपूर्ण गावाचे कौतुक केले. पाहणी करताना दृष्यस्वरुपात गावातील नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, स्वच्छ असलेले रोड, सुंदर व मनमोहक बगीचा, सौंदर्यात्मक प्रवेशव्दार, गावाची सातत्याने होणारी स्वच्छता, गावाच्या बाहेरील रोडची श्रमदानातून होणारी स्वच्छता, 850 वृक्षांचे वृक्षारोपन व संवर्धन, शालेय परिसर स्वच्छ, शाळा बंद पण शिक्षण सुरु उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी, 100 टक्के करवसुलीचे प्रयत्न , युवक – युवतीसाठी विविध स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण वर्ग, ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडी ISO होण्यासाठीचे नियोजन इत्यादी नाविण्यपूर्ण उपक्रम दाखविण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन मुख्याध्यापक श्री. रत्नाकर भेंडे यांनी केले तर आभार जिल्हा परिषद शाळेत शिक्षक चापले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील युवक युवती यांनी मोलाचे सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular