Tuesday, April 16, 2024
Homeचंद्रपुरस्वर्गीय किसनलाल मदन गोपालजी भैय्या फाउंडेशन द्वारा गणवेश वितरण

स्वर्गीय किसनलाल मदन गोपालजी भैय्या फाउंडेशन द्वारा गणवेश वितरण

ब्रह्मपुरी

       नेवजाबाई भैय्या हितकारणी शिक्षण संस्था द्वारा संचालित नेवजाबाई हितकारणी विद्यालय ब्रह्मपुरी येथे सोमवार दिनांक 22. 2. 2021 ला सकाळी 11 वाजता स्वर्गीय  महादेवरावजी बनपूरकर स्मृती सभागृहात “स्वर्गीय किसनलाल मदनगोपालजी भैय्या फाउंडेशन” द्वारा नवप्रवेशित वर्ग 5 च्या सर्व 119 विद्यार्थ्यांना गणवेश वितरणाचा सोहळा घेण्यात आला. उल्लेखित फाउंडेशन द्वारा दरवर्षी नेवजाबाई भैय्या हितकारणी शिक्षण संस्थेद्वारा संचालित तिन्ही शाळांमध्ये वर्ग 5 च्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात येतो. परंतु सत्र 2020 -21 मध्ये कोरोना मुळे शाळा बंद होत्या त्यामुळे सदर कार्यक्रम हा वर्ग 5 ची शाळा सुरू झाल्यानंतरच घेता आला.


         गणवेश वितरण कार्यक्रमाच्या मंचावर अध्यक्षस्थानी नेवजाबाई भैय्या हितकारणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया होते. प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट भास्करराव उराडे सहसचिव नेवजाबाई भैय्या शिक्षण संस्था, प्रो. सुभाष बजाज ज्येष्ठ सदस्य नेवजा बाई भैय्या शिक्षण संस्था, देवानंद राऊत मुख्याध्यापक ने .ही. विद्यालय ब्रह्मपुरी, शिवराज मालवी पर्यवेक्षक ने. ही. विद्यालय ब्रह्मपुरी, हे उपस्थित होते. 
       कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक राऊत यांनी केली तर गणवेश वितरणाचे महत्व अध्यक्ष अशोक भैया यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विशद केले तसेच प्रमुख अतिथी यांनीसुद्धा विद्यार्थ्यांकरता गणवेशाचे महत्त्व काय आहे याबद्दलचे मार्गदर्शन केले
         गणवेश वितरण कार्यक्रम प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, वर्ग 5 चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन किसान सर यांनी केले तर आभार नाईक सर यांनी केले

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular