Thursday, March 28, 2024
Homeचंद्रपुरशिक्षणाधिकारी यांच्या आवाहन ला प्रतिसाद

शिक्षणाधिकारी यांच्या आवाहन ला प्रतिसाद

महात्मा गांधी विद्यालयात कुंडी प्रकल्प ची अमलबजावणी,,
गडचांदूर,,(ता,प्र,)
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिताली सेठी पर्यावरण प्रेमी असून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खाजगी शाळा, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालयात व व्हरांड्यात प्रत्येक कर्मचाऱ्यांनी, स्व इच्छेनुसार एक कुंडीतील शोभिवंत झाड,लावून कार्यालय, व परिसर सुभोशीत करण्याची सूचना केली, हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळेत राबविण्याच्या दृष्टीने शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबविण्याची सूचनावजा विनंती केली होती, त्या अनुषंगाने.


जिल्ह्यातील नामवंत असलेल्या महात्मा गांधी विद्यालय, व उच्च माध्यमिक विद्यालय ,गडचांदूर च्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापीका तथा प्राचार्य सौ,स्मिताताई चिताडे यांनी हा अभिनव उपक्रम तातडीने यशस्वी रीतीने राबविला,कार्यालयात व परिसरात शोभिवंत झाडांच्या कुंड्या ठेवून परिसर सुभोशीत केला, यासाठी उपमुख्याध्यापीका शोभाताई घोडे,पर्यवेक्षक अनिल काकडे,इतर शिक्षक, शिक्षिका, विध्यार्थी यांचे महत्त्व पूर्ण योगदान लाभले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular