Thursday, April 18, 2024
Homeचंद्रपुरशार्ट शर्किटच्या आगीत संपूर्ण घर जळून खाक,

शार्ट शर्किटच्या आगीत संपूर्ण घर जळून खाक,


__ फारुख शेख
*क्षणात होत्याचं नव्हतं झालं
*आगीत संपूर्ण घर जळून खाक, मोठं आर्थिक नुकसानही झालं
जिवती :  तालुक्यातील शेडवाही येथे एका विद्युत शार्ट शर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना सोमवारी राञो १२.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे.संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने घरांची राखरांगोळी झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.


             शेडवाही येथे राहत असलेल्या दत्तु सोमा वाढाई यांच्या घराला विद्युत शार्ट शर्किटमुळे अचानक राञो आग लागली.गाढ झोपेत असताना हि घटना घडली आग ऐवढी भिषण होती की या भिषण आगीला कुणालाही विजवता आले नाही.सुदैवाने घरातील संपूर्ण सदस्य शेजारच्या घरात झोपायला गेल्यामुळे मोठा अनर्थ ठळला.या घटनेते कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी आगीमध्ये घरातील संसारपयोगी साहित्यासह १५ बॕग रासायनिक खत,डिजे साऊंड,टिव्ही,फ्रिज अशा मौल्यवान वस्तूही जळून खाक झाल्याने जवळपास पाच ते सहा लाखाचे नुकसान झाले आहे.यापुर्वी जुलै महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे दत्तु वाढई यांच्या शेतातील एका एकरात लावलेले दोडके,चवळी वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते.शासनाने आतापर्यंत त्यांना मदत केली नाही.आदीच्या संकटात असलेल्या कुंटुंबीयावर पुन्हा विद्युत शार्ट शर्किट होऊन मोठे नुकसान झाले आहे.या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने या कुटुंबीयांना तातडीने मदत करण्याची मागणी केली जात आहे. पांडुरंगजी जाधव यांची भेट ————————–———————- सदर व्यक्तीच घर व गोठा हे जळून खाक झाले असून यांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक तर्फे जी आर्थिक मदत आहे ती आम्ही मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू पांडुरंगजी जाधव संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular