Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरराजुरा नगरपालिकेच्या प्रशासकीय भवनासाठी दहा कोटी.-- आमदार सुभाष धोटे.

राजुरा नगरपालिकेच्या प्रशासकीय भवनासाठी दहा कोटी.
— आमदार सुभाष धोटे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये घोषणा.

राजुरा (ता.प्र) :– राजूरा शहराचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नगरपालिकेचे कार्य प्रशंसनीय आहे.बेघर वासियांना घरे बांधून देण्यासाठी नगर प्रशासनाने ठोस पावले उचललेली आहे.बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविले आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात पालिका प्रशासनाने प्रशंसनीय कार्य केलेले आहे. शहरातील मूलभूत प्राधान्याने सोडविण्यासाठी व अद्ययावत प्रशासकीय इमारत निर्माण करण्यासाठी दहा कोटी देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सुभाष धोटे यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.


राजुरा नगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी covid-19 संकटांमध्ये भरीव योगदान करणाऱ्या विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या संकल्पनेतून यावर्षीपासून “राजुरा भूषण” पुरस्कारची सुरुवात करण्यात आली. सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा “राजुरा भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षीचा राजुरा भूषण पुरस्कार “बाळू ” संस्थेच्या माध्यमातून कुपोषित बालकांना सकस आहार देणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष अमित महाजनवार यांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. युवक, महिला सक्षमीकरण बेघर वासियांना घरे बांधून देण्याची योजना, शहरातील ओपन स्पेस सौंदर्यीकरण, ग्रीन जिम संकल्पना, डिजिटल एलईडी स्क्रीन द्वारे नागरिकांमध्ये जनजागृती, विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी अद्यावत प्रशासकीय यंत्रणा.स्वच्छता व हिरवे शहर बनवण्याच्या दृष्टीने प्राधान्य, अद्यावत डिजिटल लायब्ररी याशिवाय शहरातील मूलभूत सुविधा करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल येईल. राज्य सरोवर योजनेअंतर्गत नगरपालिके समोरील मालगुजारी तलावाचे सौंदर्यीकरण अंतिम टप्प्यात आहे .या वर्षात नागरिकांसाठी लोकार्पण करण्यात येण्याची आश्वासन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी याप्रसंगी दिले.
१२ हजार मॅट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करून कचरामुक्त शहराकडे वाटचाल सुरू आहे. येणाऱ्या काळात आपल्या राजुऱ्याला फाईव्ह स्टार रँक प्राप्त करून देण्याचा आपला मानस असून सर्व नागरिकांनी नगर परिषद उपक्रमांना सहकार्य द्यावे असे आवाहन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले.या प्रसंगी स्वच्छता, शिक्षण प्रचारार्थ संविधान चौक राजुरा येथे एल. ई. डी. स्क्रिन डिस्प्लेचे उद्घाटन नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, विलास बोंगीरवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रंजन लांडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, नगरसेवक आनंद दासरी, हरजित सिंह संधू, गजानन भटारकर, राजु डोहे, रमेश नळे, राधेश्याम अडाणीया, दिलीप देरकर, भाऊजी किन्नाके, स्वीकृत सदस्य माजिद कुरेशी, मधुकर चिंचोलकर, नगरसेविका सौ. शारदा टिपले, गीता रोहने, संध्या चांदेकर, वज्रमाला बत्कमवार, दिपा करमनकर, साधना भाके, दिपाली हिंगाणे, प्रिती रेक्कलवार आदी मान्यवरांसह शहरातील अनेक गनमान्य नागरिक, पत्रकार , शिक्षक, न. प. कर्मचारी आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular