Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुररक्तदान करून पोलिस शिपाई ने वाचवले चिमुकली चे जीव

रक्तदान करून पोलिस शिपाई ने वाचवले चिमुकली चे जीव

:- खाकी वर्दी मधुन दाखवली माणुसकी धर्म…..

ब्रम्हपूरी:- रक्तदान म्हणजेच सर्वात मोठे दान असुन कोरोना काळात अनेक रक्त पुरवठा संस्था व संघटना कार्यशील होत्या.अशामध्येच काल अचानक प्रकुती खराब झाल्याने पोवनपार येथील कुमारी श्रुतिका बंडु चौधरी वय १३ असुन ही उपचारासाठी ब्रम्हपूरी येथील ख्रिस्तानंद दवाखान्यात दाखल करण्यात आले.पण हिला (A) निगेटीव रक्ताची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले .काल पासुन या चिमुकली च्या रक्ताच्या पोस्ट सोसल मिडिया मध्ये वाईरल झाले. रक्त पुरवठा करणाऱ्या संस्था व संघटना सर्व या मुलीच्या रक्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.तरी पण (A) निगेटिव्ह रक्तगट मिळेनासे झाले होते. पण पारडगाव येथील रक्त पुरवठा करणाऱा मंगल पारधी यांनी आपल्या कौशल्य बुद्धी ने ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस शिपाई सचिन बारसागडे यांना एका चिमुकल्या मुलीला रक्ताची गरज असल्याचे सांगितले क्षणाचं विलंब न करता लगेच त्या मुलीला दवाखान्यात जाऊन रक्त दान केले.यांच्य या कार्याने खाकी वर्दी मधुन एक माणुसकीचा चेहरा बघायला मिळाला असुन यांचे हे कार्य नक्कीच खाकी वर्दी ला अभिमानस्पद आहे.आणि समाजाला प्रेरणा देणारे कार्य असुन त्यांचे शहरात अभिनंदन होत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular