Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरमानोली (खुर्द)येथे मीना राजू मंच च्या वतीने मुलींसाठी आरोग्य शिबीर

मानोली (खुर्द)येथे मीना राजू मंच च्या वतीने मुलींसाठी आरोग्य शिबीर

गडचांदूर-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानोली(खुर्द)येथे मीना राजू मंच अंतर्गत 8 वी च्या शालेय विद्यार्थीनी साठी आरोग्य शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले.


कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शंकरराव रामटेके होते,प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक जी,व्ही, पवार,केंद्र प्रमुख विलास देवाळकर, डॉ,स्नेहा मोते, कु,जिचकार,मुन मॅडम,मीना मंच प्रमुख सीता मेश्राम उपस्थित होत्या,
याप्रसंगी डॉ, मोते यांनी 8 वी च्या मुलींना जीवन शैली, आरोग्य, नैतिक मूल्ये,मासिक पाळी संबंधित मार्गदर्शन, गुड टच,बॅड टच,पोक्सो बाल संरक्षण कायदा या विषयावर चर्चा करून उपयुक्त मार्गदर्शन केले,
मुलींना फोलिक ऍसिड च्या गोळ्या चे वाटप करण्यात आले,कार्यक्रमाचे आयोजन राजेश पवार व वनपाल सोयाम यांनी केले,सूत्र संचालन सुप्रिया व संस्कृती यांनी केले ,आभार राजेश पवार यांनी मानले,

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular