Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरमाँस्क आणि डेटाँल साबुन वाटुन साजरा केला खंडाळ्याच्या उपसरपंचाने मुलिचा वाढदिवस

माँस्क आणि डेटाँल साबुन वाटुन साजरा केला खंडाळ्याच्या उपसरपंचाने मुलिचा वाढदिवस

ब्रम्हपुरी,-
ब्रम्हपुरी जवळिल खंडाळा गावचे उपसरपंच नंदकिशोर राखडे यांनी त्यांची मुलगी दिव्यांका हिचा पाचवा वाढदिवस गावभर माँस्क आणि डेटाँल साबुन वाटुन साजरा केला.


उपसरपंच नंदकिशोर राखडे यांनी त्यांची मुलगि दिव्यांका हिचा पाचवा वाढदिवस मोठ्या धुमधड्याक्यात करण्याचे ठरविले होते.परंतु कोरोना महामारिमुळे त्यांच्या आनंदावर विरजन पडले. तेव्हा त्यांनी वाढदिवसाच्या वाचलेल्या पैशातुन माँस्क आणि डेटाँल साबुन खरेदि करुन मुलिच्या वाढदिवशि गावभर वाटण्याचा निर्णय घेतला.आणि यांच्या या उपक्रमाला त्यांच्या कुटुंबीयांनी सुध्दा साथ दिलि. सध्या आपल्या देशात कोरोना या महामारिने हाहाकार माजविलेला असुन सध्यातरि माँस्क आणि हँन्डवाँश यांच्यानेच आपण स्वताचे रक्षण करु शकतो. नंदकिशोर राखडे यांच्या उपक्रमाचे गावभर कोैतुक केले जात आहे. सदर कार्यक्रमाला गावच्या सरपंच अर्चना डेंगे,ग्रा.पं,सदस्य अरुण अलोने,खुशाल राखडे, ग्रा.पं.कर्मचारी विष्णु राखडे,देवेंद्र तलमले,तसेच दिव्यांकाचा परिवार प्रामुख्याने उपस्थित होता.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular