Thursday, March 28, 2024
Homeचंद्रपुरब्रह्मपुरी विधानसभा अध्यक्षपदी जगदीश उर्फ मोंटू पिलारे तर जिल्हासचिव पदी अनुकूल शेंडे...

ब्रह्मपुरी विधानसभा अध्यक्षपदी जगदीश उर्फ मोंटू पिलारे तर जिल्हासचिव पदी अनुकूल शेंडे यांची नियुक्ती


ब्रह्मपुरी


राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीत जगदीश उर्फ मोंटू पिलारे सह अनेक नवयुवक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या कार्याची पावती लक्षात घेता ब्रह्मपुरी तालुक्यातच नव्हे तर विधानसभा क्षेत्रात तील प्रत्येक खेड्यातील घराघरात शरदचंद्र पवार साहेबांचे विचार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या आणि बळकट बनविण्याच्या उदात्त हेतूने ब्रह्मपुरी येथील जगदीश उर्फ मोंटू पिलारे यांची ब्रह्मपुरी विधानसभा अध्यक्षपदी तर अनुकूल शेंडे यांची जिल्हा सचिव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी वैद्य यांनी नुकतीच पत्र देऊन नियुक्ती केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा माजी आमदार मोरेश्वर टेंभुर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्षा बेबीताई उईके, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील दहेगावकर, ब्रह्मपुरी तालुका अध्यक्ष वासुभाऊ सोंदरकर, अतुल राऊत, अमोल ठेंगरि, राकेश शेंडे, अक्षय जांबूळे यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular