Saturday, April 20, 2024
Homeचंद्रपुरब्रम्हपुरी नगरपरिषदे च्या मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा

ब्रम्हपुरी नगरपरिषदे च्या मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा



:- जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम यांची मागणी….
:- गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा….
:- ब्रम्हपुरी स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांना निवेदनाद्वारे मागणी…..

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी नगरपरिषदेने शहरात खनिज निधी अर्तंगत पाणी पुरवठा पाईप लाईन चे काम मोठ्या जोराने सुरू आहेत. ब्रम्हपुरी शहरातील रोडचे खोदकाम करून पाईप लाईन टाकण्यात येत आहे.


ब्रम्हपुरी शहरालगत खेडमक्ता ही स्वतंत्र ग्रामपंचायत असुन ब्रम्हपुरी शहरात सुरू असलेल्या पाईप लाईन चे खोदकाम करण्याअगोदर संबंधित विभागा कडून रितसर परवानगी घेण्यात आली नाही. ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा कोणत्याही प्रकारचा खेडमक्ता ग्रामपंचायत हद्दीत नसताना सुद्धा पाणी पुरवठा पाईप लाईन चे अनाधिकृत खोदकाम सुरू आहे.
सदर खोदकाम नागरिकांच्या येणे – जाण्यासाठी मुख्य रस्ता असुन यावर सुमारे चार फूट रुंद व बारा फुट लांब असे खोदकाम अनाधिकृत खोदकाम करण्यात आले आहे. खोदकाम करताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुचना फलक, बॅरिकेड्स,इतर कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही. सदर खोदकामामुळे जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर रस्त्याने जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम जात असताना खोदकाम करणाऱ्या कामगारांना विचारले असता सीओ (मुख्याधिकारी) साहेबांचा आदेश असल्याचे सांगितले. सदर मौक्यावर खेडमक्ता ग्रामपंचायत चे उपसरपंच दिपक देशमुख, शेखर बोरघरे, महेश सोनकुसरे, गणीखॉ मेश्राम, उपस्थित होते. काही वेळातच ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर त्या ठिकाणी पोहोचले. जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम या लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित असताना सुध्दा उपसरपंच व गावातील नागरिकांना जोरजोराने शिवीगाळ करून ते कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. व तिथून निघून गेले. सदर खोदकाम केलेले अपघातस आमंत्रण दिले जात आहे. या रस्त्याने खेडमक्ता येथील नागरिकांना ब्रम्हपुरी शहरात कामानिमित्त दुचाकी, चारचाकी, अवमान करावे लागते. आणि सदर खोदकामामुळे जिवितहानी होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर खोदकाम नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी रितसर परवानगी घेतली नाही. आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आले नाही. अशा बेजबाबदार मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई मेश्राम यांनी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular