Thursday, April 25, 2024
Homeचंद्रपुरब्रम्हपुरी तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदनचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध

ब्रम्हपुरी तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदन
चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध


ब्रम्हपुरी— चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूर मध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील गावाचा समावेश करण्यात आला आहे , ज्याला आक्षेप आहे असे वाटते त्यांनी आपल्या हरकती जिल्हाधिकारी यांचे कडे पाठवून आक्षेप नोंदणी करावी असे जाहीर केले आहे.

त्या अनुषंगाने ब्रम्हपुरी तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध आक्षेप अर्ज उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांचे मार्फत मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर, मा.मुख्यमंत्री, मा.उप मुख्यमंत्री,मा. पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर , यांना देण्यात आले. यावेळी ब्रम्हपुरी तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद चौधरी , सचिन बदन , उपेंद्र बोरुले, प्रशांत डांगे,संजय पगाडे, गुरुदेव वाघरे ,रवी चामलवार दत्तात्रय दलाल ,उत्तम लोखंडे उपस्थित होते .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular