Thursday, March 28, 2024
Homeचंद्रपुरबोदबोदी धबधबा परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास करा.

बोदबोदी धबधबा परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास करा.

गडचांदुर– मो.रफिक शेख- तालुक्यातील मेहंदी गावालगत असलेल्या नाल्यात बोदबोदी नावाचा धबधबा आहे. या परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यात यावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होते आहे.


सदर स्थळ कोरपना – आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला अगदी लागून आहे. पावसाळ्यात येथील नाल्यावरील हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षक परवणी असते. त्यामुळे येथे दूर वरून पर्यटक येतात. परंतु धबधबा व्यतिरिक्त या स्थानी अन्य पर्यटन सोयी नाही. या दृष्टीने पर्यटन सोयी निर्माण झाल्यास हे एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकते. त्यासाठी या भागात बगीचा , ओपन जिम , चिल्ड्रन्स मनोरंजन
पार्क तयार करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यासाठी परिसरात शासकीय जमीन मुबलक उपलब्ध आहे. याकरिता लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular