Friday, April 19, 2024
Homeचंद्रपुरपीएम इन्फ्राव्हेंचरचा यशोधन विहार प्रोजेक्ट काळोखात

पीएम इन्फ्राव्हेंचरचा यशोधन विहार प्रोजेक्ट काळोखात

३ लाखाचे वर वीज बिल थकविले

श्रीवास्तव कंपनीतही अंधार
गडचांदुर- मो.रफिक शेख –
नांदा फाटा येथे प्रधानमंत्री आवास व म्हाडा योजनेतून सुरू असलेल्या ड्रीम प्रोजेक्ट चा वाजपुरवठा खंडीत केल्याने यशोधन विहारात काळोख पसरला आहे.

नांदाफाटा औद्योगिक परिसरात पीएम इन्फ्राव्हेंचर या कंपनीकडून प्रधानमंत्री आवास व म्हाडा योजनेतून २३ एकरात यशोधन विहार या नावाने सर्व सोयीसुविधांनी युक्त टाउनशिप तयार केली जाणार आहे सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीत घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत वन बीएचके फ्लॅटची किंमत ८.३६ रुपये ठेवण्यात आली यात प्रधानमंत्री आवास योजनेतुन २.५ लाख रुपयाची सुट , स्टॅम्प ड्यूटी जीएसटी , रजिस्ट्रेशनवर ८२ हजार रुपयाची सुट या व्यतिरिक्त बांधकाम कामगार असल्यास २ लाख रुपयांची अतिरिक्त सूट मिळण्याचे आमीष जाहीरातीत दाखविले होते यशोधन विहार प्रोजेक्टचा परिसरात फार मोठा गाजावाजा करून प्रचार प्रसार करण्यात आला होता नांदा ग्रामपंचायतीच्या एका सदस्याने परिसरातील अनेक नागरिकांकडून स्वस्तात फ्लॅट मिळणार असे आमिष दाखवून अर्जही भरून घेतले होते आता मात्र यशोधन बिहार प्रोजेक्टचे काम बंद असून ३ लाख ३२ हजार रुपयाचे वीज बिल थकविल्याने विद्युत वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला असल्याने पीएम इन्फ्राव्हेंचर कंपनीच्या ड्रीम प्रोजेक्ट यशोधन विहार टाउनशिपमध्ये सर्वत्र काळोख पसरला आहे यशोधन विहार टाऊनशिपमध्ये नागपूरच्या एका बडय़ा नेत्याच्या सहभाग असल्याचे बोलले जाते यशोधन बिहारची काम पाहणार्‍या श्रीवास्तव अॅन्ड कंपनीचे ४ विज मिटरचे कनेक्शन तोडल्याने इथेही सर्वत्र अंधार पसरला आहे यशोधन विहार टाऊनशीप होणार की नाही अशी उलटसुलट चर्चा जनमानसात आहे

यापुर्वी ठोठावला होता दंड

यशोधन विहार टाऊनशिप प्रोजेक्टकरिता कोळशी घाटांवरून फार मोठ्या प्रमाणात रेती आणून साठा करण्यात आला होता याबाबत विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने चौकशीअंती ३२ लाख रुपयाचा दंड ठोठावला होता

हा प्रोजेक्ट खाजगी आहे सर्वसामान्य नागरिकांना दिव्य स्वप्न दाखविण्यात येत आहे
यापूर्वी याचठिकाणी लेआऊट टाकून प्लॉट पाडण्यात आले होते ते विकले न गेल्याने चांगलीच गोची झाली होती यशोधन विहार प्रोजेक्ट होणार याबाबत साशंकता वाटते काही ग्रामपंचायत सदस्य या प्रोजेक्टचा गाजावाजा करीत आहे सत्तेचा दुरुपयोग करुन याच ग्रामपंचायत सदस्यांने ग्रामपंचायतीकडून अनेक नाहरकती दिल्या पण त्यांची नोंद ग्रामपंचायत दप्तरी नाही

   अभय मुनोत 

मा. सदस्य ग्रामपंचायत नांदा

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular