Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरपर्यावरणाचे संतुलन टिकवण्यासाठी वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन महत्वाचे

पर्यावरणाचे संतुलन टिकवण्यासाठी वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन महत्वाचे


– रोटेरियन हिरालाल बघेले

वरोरा : भारतासारख्या निसर्ग पूजक देशात पर्यावरणावर गंभीर संकट उभे ठाकले आहे. यासाठी वृक्षारोपण महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संतुलन टिकवण्यासाठी, तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड सह वृक्षसंवर्धन करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ वरोऱ्याचे अध्यक्ष हिरालाल बघेले यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ वरोरा यांच्या विद्यमाने स्थानीक दिशा स्कुल ऑफ इनोव्हेटिव्ह लर्निंगच्या प्रांगणात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिशा स्कुल ऑफ इनोव्हेटिव्ह लर्निगचे संचालक खेमराज कुरेकार यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ वरोऱ्याचे सचिव बंडू देऊळकर प्रामुख्याने उपस्थित होते.
बघेले पुढे म्हणाले की, वृक्ष देशाच्या नैतिक, सामाजिक व आर्थिक समृद्धीचे मूलस्त्रोत असून त्याचे संवर्धन आवश्यक आहे.
देऊळकर म्हणाले की, कोरोनाकाळात ऑक्सीजनसाठी होणारी ससेहेलपट पाहून वृक्षाचे जीवनातील महत्व लोकांना कळलेले आहे. क्लबने सुद्धा पुढाकार घेऊन अशा कार्यक्रमांना अग्रक्रम दिलेला आहे. यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय समारोप करताना खेमराज कुरेकार म्हणाले की, रोटरी क्लब ऑफ वरोराचा स्थापनेपासूनच शहरातील लोकसेवेत सहभाग हा नेहमीच महत्वाचा ठरत आलेला आहे. या उपक्रमाचेही त्यांनी भरभरून कौतुक केले. विविध तर्फे घ्यावे अशी मागणी केली.
यावेळी शाळा परिसरात प्रमुख अतिथी सह, रोटेरियन सर्वश्री सचिन जीवतोडे,, डॉ.विवेक तेला, पराग पत्तीवार, भाजपाले, राम लोया, विजय पावडे, जितेंद्र मत्ते, अदनान सिद्दीकोट, योगेश डोंगरवार, राजेश काळे, सातपुते, आदींच्या उपस्थितीत विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमात माजी रोटरियन अध्यक्ष विवेक तेला यांनी रोटरी पिन लावून नवनियुक्त रोटरी सदस्य म्हणून अभिजित मानकर व गणेश पावडे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम पिसे यांनी केले.आभार दिशा स्कुलच्या प्राचार्या घागी यांनी मानले.
या प्रसंगी संस्थेचे कर्मचारी वृंद, विद्यार्थी व समस्त रोटरीयनची विशेष उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular