Thursday, April 25, 2024
Homeचंद्रपुरनागभिड पोलिसांनी अनोळखी व्यक्तीला पोहोचवीले त्याच्या गावी…

नागभिड पोलिसांनी अनोळखी व्यक्तीला पोहोचवीले त्याच्या गावी…

ता.प्र.नागभीड-


  चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौशी येथे अनोळखी व्यक्ती फिरत असल्याची माहिती पोलिस स्टेशन नागभिड येथे मिळाली असता,नागभीड पोलिस मौशी येथे प्रत्यक्ष गेले व,दुर्योधन यादव वय २७ यास ताब्यात घेतले.


     ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याची विचारपूस केली असता त्याने पागोरा फाटा रायपुर येथील असल्याचे सांगितले.या माहिती च्या आधारे नागभिड पोलिसांनी डी.डी.नगर पोलीस स्टेशन रायपुर यांचेशी संपर्क साधला व अनोळखी इसमाची माहिती दिली.त्यांनी लगेच माहिती आधारावर चौकशी केली असता,सदर इसम पागोरा फाटा रायपूर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. 
       यानंतर त्याचे स्वगावी लहान भाऊ उधरु वैशाली यादव यांचेकडे सोपविण्यात आले..सारथी योजनेखाली नागभिडचे पथक प्रमुख अरुण वाजुकर, पो.शिपाई खणाके, गायकवाड, यांनी सुखरूप पोहचवून पोलीस विभागाची जबाबदारी पार पाडली.यामुळे नागभिड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे..
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular