Friday, April 19, 2024
Homeचंद्रपुरनवख्या उमेदवारांकडुन गाव विकासाची अपेक्षा………

नवख्या उमेदवारांकडुन गाव विकासाची अपेक्षा………


*ग्रामपंचययत निवडणूक *
*विकासापासुन काेसाे दुर पाथरी गाव *

सावली :
सावली तालुक्यातील पाथरी मोठे ठिकाण असून परिसरातील 30-40 गावे दररोज संपर्कात येतात.

शिक्षणाची सोय, आरोग्याच्या सुविधा, महाविद्यालय, तलाठी कार्यालय, आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, जयकिसान ग्रामीण बँक, मंडळ अधिकारी कार्यालय, महावितरणचे 33के व्ही उपकेंद्र वनविभागाचे कार्यालय, कायदा व सुव्यवस्थेसाठी इंग्रज कालीन पोलीस स्टेशनं, सिंचनाच्या सोयीसाठी आसोला मेंढा तलाव आणि तिथे इंग्रजांनी निर्माण केलेले रेस्ट हाऊस, पेट्रोल पम्प पोस्ट ऑफिस, सेतू सुविधा केंद्र, अशे अनेक कार्यालये असताना आणि परिसरातील जनता आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी या ठिकाणी येत असताना स्थानिक प्रतिनिधी यांच्या दुर्लक्षित पणामुळे कित्तेक दिवसापासून पाथरी नगरी विकासापासून मागे येत आहे. स्थानिक प्रतिनिधींच्या चुकीमुळे किव्हा त्यांच्या हितामुळे सावली तालुक्याची निर्मिती करून पाथरी नगरीला विकासापासून मागे ओढण्याचे काम येथील स्थानिक प्रतिनिधींनी केले आहे. या ठिकाणी असलेले काही कार्यालये तालुक्याच्या ठिकाणी हलविण्यात आले.सिंचनाच्या सोयीसाठी निर्माण केलेले इंग्रज कालीन तलाव देखरेख करण्यासाठी सिंचाई विभागाचे शाखा अभियंता कार्यालय येथून हलवून मोडकळीस आणले. परिसरात कायदा व सुव्यवस्था यांचे रक्षण करण्यासाठी इंग्रज कालीन पोलीस स्टेशन असून पाथरी नगरी सिंदेवाही तालुक्यात असताना मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी येथे राहायचे, पण सिंदेवाही तालुक्याचे विभाजन करून येथील स्थानिक प्रतिनिधींच्या स्वार्थी हेतूने आणि दुर्लक्षित पणामुळे सावली तालुक्याची निर्मिती करून पाथरी नगरीला सावली तालुक्यात समावेश करण्यात आला, याला स्थानिक प्रतिनिधींनी विरोध न केल्यामुळे इथूनच पाथरी नगरीच्या विकासाला खिंड पडली आणि दिवसेंदिवस पाथरी नगरी विकासापासून मागे ओढल्या जाऊन आजही वंचित असल्याचे चित्र पाथरी वासीय तथा परिसरातील जनतेला बघावयास मिळत आहे. मागील पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी सतत 15 वर्षे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रणित सत्ता होती पण विकास शून्य असल्यामुळे पाथरी ग्रामवासीय जनतेनी विकासाच्या दृष्टीने आशा बाळगत मागील पंचवार्षिक निवडणुकीत कांग्रेस प्रणित लोकांच्या हातात हसत हसत विकासाची अपेक्षा करीत एक हाथी सत्ता दिली. जनतेला वाटले कि यांच्या कडून तरी गावाचा विकास होईल. पण पाच वर्षाचा कार्यकाळ संम्पला तरी विकास काही दिसेना, विकासाला येथील स्थानिक नेत्यांनी गायबच केल्यामुळे या पाच वर्षातील कांग्रेस प्रणित सत्ताधाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करीत नाराजीच केली. त्यामुळे येथील स्थानिक राजकीय पुढारी व या पाच वर्षातील ग्रामपंचायत वर बसलेल्या लोक प्रतिनिधींवर कमालीची नाराजी व्यक्त केल्या जात आहे. या ठिकाणी आरोग्याच्या समस्या, स्वच्छतेच्या समस्या, नालीची व्यवस्थित सफाई नाही, शिक्षणाच्या समस्या रोजगाराच्या समस्या, दळणवळनाच्या समस्या, रस्त्याच्या समस्या अशा अनेक समस्यांनी पाथरी नगरी ग्रासली आहे. पाण्याची समस्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. इथे असलेल्या नळाला पाण्याचा योग्य पुरवठा होत नसल्याने महिला भगिनीं त्रस्त आहे. आरोग्याच्या दृष्टीने पाण्याची समस्या ही फार महत्वाची असूनही येथील प्रतिनिधीला विनंती करून सुद्धा दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे महिला भगिनीं कमालीची नाराजी व्यक्त करीत आहे. या पाच वर्ष्याच्या कार्यकाळातील विकास जर बघितला तर गावातील तीन ते चार अंतर्गत रस्ते सोडल्यास पाथरी नगरी विकास शून्य आहे. या ठिकाणी रोजगाराची संधी नाही. उत्तम आरोग्य सेवा नाही, शिक्षण व्यवस्था नाही, पण स्थानिक लोकनेत्याना विकास नको असल्यामुळे नगरी विकासापासून कोसो दूर आहे. पाथरी नगरीच्या विकासाच्या दृष्टीने पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीने पुढाकार घेत वेळोवेळी इथे असलेल्या समस्या पदाधिकारी यांच्या लक्षात आणून देत असून, पाथरी तालुक्याची मागणी करीत आहे. त्यासाठी समितीचे पदाधिकारी यांनी अनेक मंत्री यांना निवेदन देत मोर्चे काढून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात दाखल होऊन मुख्य सचिव यांना सुद्धा निवेदन दिली आहेत. विकासाच्या दृष्टीने पाथरी तालुका निर्माण संघर्ष समिती कार्य करीत असताना येथील स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी छुपा विरोध करीत असल्याचे जनतेमध्ये बोलले जात आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आरोग्याच्या दृष्टीने बाहेर शौचास जाऊ नये या करिता पाहिजे त्यांना शौचालय योजना सम्पूर्ण देशात राबविण्यात आली. पण पाथरी ग्रामपंचायत ने गरजू लाभार्थ्यांना शौचालय न दिल्यामुळे आजही बाहेर शौचास जातानाचे बघायला मिळत आहे. आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने आपली हद्द पर करीत गावाच्या सुरुवातीसच 100% हागणदारी मुक्त गाव फलक लावून आपल्या विकासाची प्रचिती दिली आहे. कित्येक ग्रामवासीय जनतेच्या घरात शौचालय नसून या योजनेत सुद्धा मोठा घोळ असल्याची शक्यता आहे. आता निवडणुकीचे वारे सुरु झाले असताना जनतेमध्ये यांच्या कार्याच्या प्रति असलेली नाराजी व्यक्त करीत असून गावाप्रती प्रेम असणारा आणि विकास करून दाखवणारा नवीन चेहरा निवडून देणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular