Thursday, March 28, 2024
Homeचंद्रपुरदालमिया भारत सिमेंट चे कामगार व प्रकल्प ग्रस्त याचे आंदोलन समाप्त.

दालमिया भारत सिमेंट चे कामगार व प्रकल्प ग्रस्त याचे आंदोलन समाप्त.

राष्ट्रवादी काँग्रेस चे हस्तक्षेप ने कंपनी ने घेतला निर्णय.

गडचांदुर प्रती.मो.रफिक शेख -.

मुरली अग्रो सिमेंट आता नव्याने दालमिया भारत सिमेंट नारंडा या कोरपना तालुक्यातील नव्याने सुरू झालेल्या सिमेंट कंपनी ने पूर्वीच्या मुरली आग्रो सिमेंट कंपनीत कामावर असलेल्या कामगारांना डावलून नवीन पर प्रंतीयाची भरती केली व उत्पादन सुरू केले याच्या विरोधात पूर्वी चे कामगार व प्रकल्पग्रस्त यांनी 6 जुलै पासून उपोषण सुरू केले होते.या आंदोलादरम्यान चार दिवस लोटून कंपनी ची कोणतीच हालचाल न दिसल्याने या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेस चे वरिष्ठ नेते कोरपना येथील सय्यद अबिद आली यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन कामगाराच्या व प्रकल्पग्रस्त याच्या रास्त मागणीला पाठिंबा दिला व याची माहिती आपल्या पक्षाच्या वरिष्ठ जिलाध्यक्ष राजेद्र वैद्य यांना दिली त्यांनी तत्काळ उपोषण मंडपाला भेट देऊन मागण्याचा पाठपुरावा करत कंपनी ला तत्काळ उत्तर देण्याचे सागितले व कंपनी चे उत्पादन बंद करण्यास सांगितले याची धास्ती घेत दालमिया सिमेंट कंपनी ने उपोषणाच्या अकरा व्या दिवशी उपविभागीय पोलिस अधिकारी पवार व ठाणेदार कोरपना यांना पाचारण करून कामगार सोबत कामगार अध्यक्ष मनोज भटारकर समवेत बैठक बोलावली यात जुने सर्व 906 कामगार व प्रकल्प ग्रस्त यांना कामावर घेण्याचे ठरले त्यानुसार दालमिया सिमेंट कंपनीचे सुरक्षा अधिकारी जूनोनकर यांनी कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोज भतारकर यांना लेखी पत्र देऊन उपोषण समाप्त करण्यास सांगितले त्या नुसार उपोषणाच्या 11 व्या दिवशी उपोष्ण मागे घेण्यात आले या दरम्यान कामगारांनी केंद्रीय श्रम आयुक्त यांना सुद्धा पत्र लिहले होते त्यांनी सुद्धा कामगाराच्या पत्राला केराची टोपली दाखवली होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular