Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरत्या शिक्षिकेला ब्रम्हपूरी बस स्थानकाच्या बस वाहकाकडून मनस्ताप!-- नागभिड येथील घटना..

त्या शिक्षिकेला ब्रम्हपूरी बस स्थानकाच्या बस वाहकाकडून मनस्ताप!
— नागभिड येथील घटना..


सुधाकर श्रीरामे
तालुका प्रतिनिधी नागरिक ब्रम्हपूरी आगारातून चंद्रपूर करीता धावणारी बस नागभिड बस थांब्यावर आली व थांबली.परंतू वेळेला अनुसरून कर्तव्यावर जाणाऱ्या एका शिक्षिकेला बस मध्ये घेण्यास बस वाहकाने मनाई केल्यामुळे,सदर शिक्षिकेला मनस्ताप सहन करावा लागला असल्याची घटना नुकतीच नागभिड बस थांब्यावर घडली आहे.

ब्रम्हपूरी आगारातून चंद्रपूर करीता जाणारी बस नागभिड येथील बस स्थानकात आली असता नौकरीवर जात असताना वाहकाने शिक्षिकेला बसमध्ये घेण्यास नकार दिला आणि वाहकाने बस पोलीस स्टेशन येथे घेण्यास चालकास सांगितले.मात्र बऱ्याच खटाटोपी नंतर बस वाहकाने पोलिस स्टेशन नागभिड येथे तक्रार दाखल न करता नौकरिवार जाणाऱ्या महिला शिक्षिकेला प्रवाशी सेवा दिली. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून शासनाचे नियम पाळून वाहक प्रवाशांशी सौज्यणन्याशी न वागता मनमानी करतात.यामुळेच खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचा फायदा होतो व बसेस रिकाम्या धावतात. बसचे कर्मचारी रस्त्यात उभे असले तरी चालक बस थांबवून त्यांना बसमध्ये घेतात.मात्र याच पद्धतीनची प्रवासांबाबत आपुलकी दाखवून त्यांना का घेत नाही?हा प्रश्न आहे. यामुळे खाजगीकरणाच्या धोरणाला प्रोत्साहन दिले जात असल्याने एस.टी.महामंडळ तोट्यात जात आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी चे ब्रीद वाक्य हे नौकरी करून पैसा कमविने एवढेच असून सेवा न देण्यासारखं प्रकार ब्रम्हपुरी चंद्रपूर प्रवाशी बसमध्ये घडून आला.नागभिड बस थांब्यावर घडलेल्या घटनांक्रमाची तक्रार ब्रम्हपुरी आगारात केली आहे. यावर डेपो व्यवस्थापक काय कार्यवाही करतात?याकडे नागभिड तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular