Friday, April 19, 2024
Homeचंद्रपुरजि.प.ऊच्च प्राथमिक शाळा,एकोणा येथील दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र बालपरीषदेकरीता निवड

जि.प.ऊच्च प्राथमिक शाळा,एकोणा येथील दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र बालपरीषदेकरीता निवड

वरोरा
कोरोना सारख्या रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शैक्षणिक संस्था बंद आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी पालक,शिक्षक व समाज चिंताग्रस्त असतांनाच सलाम मुंबई फाऊंडेशन मुंबई च्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षणाचे माध्यमातून राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना एकत्रित करून महाराष्ट्र बालपरीषदची निर्मीती करण्यात आली.


या बालपरीषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करने, मुलामुलींमध्ये आत्मविश्वास वृद्धींगत करण्याचा प्रयत्न करणे. स्वत:चे मत निर्भीडपणे व्यक्त करण्याचे साहस निर्माण करणे.ध्येय गाठण्याकरीता प्रयत्न करणे, शासकीय यंत्रणेसोबत समन्वय साधून समस्येवर मात करित सामाजिक समस्येवर समाधान शोधणे,व्यसनाधिनतेच्या समस्येबाबत जागरूक राहून नियंत्रणाकरीता शक्य ते पर्याय पडताळून पाहणे व त्यासाठी प्रयत्न शिल असणे, विद्यार्थ्यांचे मनात विवेक निर्माण करूण देशाचे उद्याचे जबाबदार नागरीक निर्माण करण्याकरीता वैचारिक जनजागृती करीत संवादाचे माध्यमातून एकमेकाचे विचाराचे संवादातून देवाणघेवाणीच्या सुंदर पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयोग सुरू केला आहे.

याकरीता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातून २५ विद्यार्थी व ५ तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील तालुका समन्वयक व व्यसनमुक्तीचे “महाराष्ट्र रत्न”पुरस्कारप्राप्त (विषयशिक्षक)श्री.पवनकुमार वाय. शर्मा यांचे
मार्गदर्शनात वरोरा तालूक्यातील जि.प.ऊच्च प्राथमिक शाळा,एकोणा येथील १)कु.सानिया रविंद्र भोयर २) कु.रुचिता जयेंद्र भोयर, व सेंट ॲनेस पब्लिक स्कुल,वरोरा येथील३) शिवांश पवनकुमार शर्मा व चेतना माध्यमिक विद्यालय,मजरा (रै) येथील ४) प्रणय कैलास कळसकर ५) कु.साक्षी राजु किन्नाके या पांच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
बालपरीषदेच्या माध्यमातून कोरोना च्या पार्श्वभूमीवर मुंबई वरून ऑनलाइन प्रशिक्षणाद्वारे या विद्यार्थांचा सहभाग नोंदवीला जात असून यामध्ये विद्यार्थी तंबाखू व तंबाखूयुक्त पदार्थांच्या सेवनाचे दुषपरीणामाची परीपुर्ण माहीती घेवून आपल्या भागातील बोलीभाषेत आपल्या परीसरातील लोकांना, आपल्या शाळेतील,वर्गातील मित्रमैत्रीणींना जागृत करण्याचा व व्यसनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगलेल्या ध्येयवेड्या विद्यार्थ्यांचा समृह तयार करुन त्याच्या सहकार्याने व्यसनमुक्ती च्या कार्याला वेग देण्याचा संकल्प मनात ठेवून सलाम मुंबई फाऊंडेशन मुंबई कार्य करीत आहे.
व्यसनमुक्त समाजनिर्मीतीचा आपला हेतू देखील निश्चीतपणे साध्य होताना दिसतो आहे. महाराष्ट्र बालपरीषदेच्या साहाय्याने सुरू असलेला हा सामाजिक उपक्रम निश्चितच कौतूकास्पद आहे. याकरीता चंद्रपूर जिल्हयात पवन कुमार शर्मा वरोरा,हरीशचंद्र पाल नागभिड, मनिष मांगरुळकर राजूरा, बाबा कोडापे जिवती, प्रशांत वाणी बल्लारपूर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular