Tuesday, April 16, 2024
Homeचंद्रपुरजंगलव्याप्त परिसरात झाडावर वास्तव्य करणाऱ्या

जंगलव्याप्त परिसरात झाडावर वास्तव्य करणाऱ्या

माकडांच्या टोळ्यांच्या टोळ्या गाव खेड्यांमध्ये वास्तव्यास

ब्रम्हपुरी : एरवी जंगलव्याप्त परिसरात झाडावर वास्तव्य करणाऱ्या माकडांच्या टोळ्यांच्या टोळ्या गाव खेड्यांमध्ये वास्तव्यास दिसून येत असून गावखेड्यातील नागरिकांच्या कौलारू घरांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत असल्याचे आढळून येत आहे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाल्यांची तसेच इतर मालाची नुकसान करीत असल्याचे पहावयास मिळत आहे ह्या वानरांच्या बंदोबस्त कश्या प्रकारे करता येईल अशा विवंचनेत येथील नागरिक व शेतकरी वर्ग आहे तर काहींनी ह्या वानरांच्या बंदोबस्त करण्यासाठी नक्कल लढवित आवाज करणाऱ्या बंदुकी ही खरेदी केले आहेत त्यामुळे काही प्रमाणात ह्या वानरांच्या टोळ्या गावात अथवा शेतावर आल्यावर वानरांना वापसी हाकलताना मदत होणार आहे त्यामुळे काहीसा फायदा होणार असल्याचे चित्र आहे अशा प्रकारे हैदोस घालणाऱ्या वानरांच्या वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरात जोर धरत आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular