Friday, April 19, 2024
Homeचंद्रपुरचंद्रपूरकर जनतेची निरंतर सेवा हेच आपले ध्‍येय – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरकर जनतेची निरंतर सेवा हेच आपले ध्‍येय – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर शहर राज्‍याच्‍या उत्‍तम शहराच्‍या यादीतील एक शहर ठरेल

चंद्रपूरात आगमनाच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेल्‍या सौंदर्यीकरणाचे लोकार्पण संपन्‍न

चंद्रपूर: शहरात विकासाची विविध कामे आम्‍ही पुर्णत्‍वास आणली. माझ्या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात चंद्रपूर शहरासाठी यापुर्वी कधीही मंजुर झाला नाही इतका निधी मंजुर झाला. चंद्रपूर शहर देखणे व सुंदर व्‍हावे यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा आम्‍ही केली. चंद्रपूरकर जनतेची निरंतर सेवा हेच आपले ध्‍येय आहे. आपण समस्‍त चंद्रपूरकरांनी एकमुखाने, एकासुरात आय लव्‍ह चंद्रपूर असे म्‍हणत या शहराच्‍या प्रगतीचा विचार केल्‍यास चंद्रपूर शहर राज्‍याच्‍या उत्‍तम शहराच्‍या यादीतील एक शहर ठरेल, असा विश्‍वास माजी अर्थमंत्री व विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला.

चंद्रपूर शहराच्‍या सिमेवर आगमनाच्‍या ठिकाणी हॉटेल ट्रायस्‍टार नजीक करण्‍यात आलेल्‍या सौंदर्यीकरण्‍याच्‍या लोकार्पण सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी महापौर राखी कंचर्लावार जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, उपमहापौर राहुल पावडे, माजी महापौर सौ. अंजली घोटेकर, झोन सभापती प्रशांत चौधरी, भाजपा महानगर कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, ब्रिजभुषण पाझारे, मनपा सदस्‍य सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, संजय कंचर्लावार, देवानंद वाढई, रवी आसवानी, वंदना तिखे, माया उईके, शितल गुरनुले, छबुताई वैरागडे, रवी लोणकर, सुनिल डोंगरे, अरुण तिखे, प्रमोद शास्‍त्रकार, प्रमोद क्षिरसागर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात त्‍यांच्‍या पुढाकाराने वैशिष्‍टयपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत सदर चौक सौंदर्यीकरणासाठी ५१ लाख रु. निधी मंजुर करण्‍यात आला. या सौंदर्यीकरणाचे लोकार्पण आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. आय लव्‍ह चंद्रपूर या संकल्‍पनेवर आधारीत सुरेख प्रतिकृती या सौंदर्यीकरणाच्‍या ठिकाणी करण्‍यात आली आहे.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, मी सरदार पटेल महाविद्यालयाचा छात्रसंघ सहसचिव झाल्‍यापासुनच या आय लव्‍ह चंद्रपूर हे शब्‍द माझ्या ह्रदयात कोरले आणि या शहराची सेवा करण्‍याचा संकल्‍प केला. १९९५ मध्‍ये मी चंद्रपूरचा विधानसभा सदस्‍य झालो. झरपट नदीवरील पुल मोठा करण्‍याची संधी मला प्राप्‍त झाली. चंद्रपूर नगरपरिषदेतील ६०६ रोजंदारी कर्मचारी सेवेत स्‍थायी करण्‍याचे काम विशेष बाब म्‍हणुन पुर्ण केले. बल्‍लारपुर तालुक्‍याच्‍या निर्मितीसाठी घेतलेली प्रतिज्ञा मी सुध्‍दा पुर्ण केली. भारतरत्‍न डॉ. ए.पी.जे. अब्‍दुल कलाम यांच्‍या श्रध्‍दांजली सभेत मी त्‍यांच्‍या स्‍मृती जपण्‍यासाठी एक उद्यान व त्‍यांचा पुतळा उभारण्‍याचे जाहीर केले व वर्षभरातच ते पुर्णही केले. चंद्रपूर शहरात देशातील अत्‍याधुनिक वनअकादमी, भारतरत्‍न ए.पी.जे. अब्‍दुल कलाम स्‍मृती निसर्ग उद्यान, स्‍व. उत्‍तमराव पाटील वनउद्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय, दाताळा गावाकडे जाणा-या केबल स्‍टेड पुलाचे बांधकाम, बाबुपेठ परिसरात स्‍व. अटलबिहारी वाजपेयी स्‍टेडीयमचे बांधकाम, बसस्‍थानकाचे अत्‍याधुनिकीकरण व नूतनीकरण, प्रियदर्शीनी इंदिरा गांधी सांस्‍कृतीक सभागृहाचे नूतनीकरण व वातानूकीकरण, जिल्‍हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनाचे बांधकाम, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, महानगरात विविध ठिकाणी मोकळया जागांचा विकास करत उद्यांनाची निर्मिती, कै. बाबा आमटे अभ्‍यासीकेचे बांधकाम, पोलिसांसाठी अत्‍याधुनिक जिम, उद्योग भवन, कोहीनुर स्‍टेडीयमचे नूतनीकरण, ऐतिहासिक दीक्षाभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम, पत्रकार भवनाचे बांधकाम, टाटा ट्रस्‍टच्‍या सहका-याने कॅन्‍सर हॉस्‍पीटला मंजुरी अशी विविध विकासकामे आम्‍ही मंजुर करविली. ज्‍युबीली हायस्‍कुल परिसरात शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके स्‍मृती स्‍टेडीयम तसेच ज्‍युबीली हायस्‍कुलचे नूतनीकरण, शहराचे आराध्‍य दैवत माता महाकाली मंदिर परिसराचा विकासकामांसाठी सुध्‍दा निधी मंजुर करण्‍यात आला असुन लवकरच या कामांना सुरवात होणार असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात विविध विकासकामे पुर्ण करताना काही विकासकामे मनात प्रस्‍तावित होती, त्‍यावर काही कार्यवाही झाल्‍याचे सांगत आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले की, चंद्रपूर येथे कौशल्‍य विकास विद्यापीठ अर्थात स्किल युनिर्वसीटी स्‍थापन करण्‍याचे आपले स्‍वप्‍न आहे. चंद्रपूर शहरातील मनपाच्‍या सर्व शाळा डिजीटल करण्‍याच्‍या दृष्‍टीने सुध्‍दा यापुढील काळात योग्‍य प्रयत्‍न आपण करणार आहोत. दाताळा गावाकडे जाणा-या पुलाच्‍या ठिकाणी लाईटींगचे काम पुर्ण व्‍हायचे असुन या ठिकाणी बंधारा बांधून अथांग जलसमुदाय सुध्‍दा येत्‍या वर्षभरात आपल्‍याला दिसणार असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. आय लव्‍ह चंद्रपूर हे केवळ शब्‍द न राहता चंद्रपूरवरचे प्रेम या शहराच्‍या प्रगतीच्‍या माध्‍यमातुन व त्‍या प्रगतीला सहकार्य करुन करण्‍याचे आवाहन त्‍यांनी यावेळी बोलताना केले. कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका सौ. सविता कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular