Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरग्रां.पं.तळोधी,(बा) चे मूत्रीघराकडे दुर्लक्ष

ग्रां.पं.तळोधी,(बा) चे मूत्रीघराकडे दुर्लक्ष

तळोधी (बा): येथील जूना बसस्थानक असलेल्या मूत्रीघराकडे ग्रां.पं.चे दुर्लक्षामुळे गंदगी पसरलेली आहे.संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.मात्र तळोधी(बा) ग्रां.पं.चे सदर मोहिमेला हरताळ फासन्याचे चित्र तळोधी (बा) मध्ये पाहायला मिळत आहे.


सदर मूत्रीघर पडक्या अवस्थेत असुन सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.लघवी करताना उभे राहने अडचणीचं आहे सगळीकडे दारुच्या बाटल्यांचा खच्च पडलेला आहे.ग्रां.पं.ने ताबडतोब लक्ष घालून मूत्रीघराची डागडुगी करावी अशी जनतेची मागनी आहे.दरम्यान होवु घातलेल्या ग्रां.पं.निवडनुकीमध्ये निवडुन आलेल्या नवनिर्वाचित ग्रां.पं.सदस्याने लक्ष घालून मूत्रीघराकळेची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा तळोधीवासीय जनता करीत आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular