Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरकोरपना नगरपंचायतीला मिळाले थ्री स्टार मानांकनांचा पुरस्कार

कोरपना नगरपंचायतीला मिळाले थ्री स्टार मानांकनांचा पुरस्कार

पश्चिम झोन मध्ये 45 वा क्रमांक :- गडचांदूर-.मो.रफिक शेख.-

केन्द्र सरकारच्या आवास व शहरी कार्य मंत्रालय मार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत होणाऱ्या स्वच्छ सर्व्हेक्षणामध्ये कोरपना नगरपंचायत नी सहभाग नोंदविला यात पश्चिम झोन मध्ये ४५ क्रमांक प्राप्त करीत जीएफसी थ्री स्टार मानांकन मिळविले आहे जीएफसी थ्री स्टार मानांकन मिळाल्याने कोरपना शहरातील नागरीक व नगर पंचायत चे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.


अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील कोरपना नगरपंचायत स्वच्छ अभियानात मागील तीन वर्षांपासून सहभाग घेत आहे. नगर पंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी वर्ग, स्वच्छता कर्मचारी,व कोरपना शहरातील समस्त नागरीक यांच्या सहकार्याने शहर स्वच्छ ठेवण्यास मदत झाली आहे. त्यामुळे सन २०१९ मध्ये 242 क्रमांक , 2020 मध्ये १६८ क्रमांक व यंदा २०२१ मध्ये उत्तम कामगिरी बजावत ४५ वा क्रमांक पटकावीत जीएफसी थ्री स्टार मानांकन पटकाविले आहे. या स्वच्छ अभियानात पश्चिम झोन मधील ५७७ शहरांनी सहभाग नोंदविला होता.
स्वच्छ भारत अभियानाचा या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद,केन्द्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी,राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दिल्ली येथील विज्ञान भवनात कोरपना नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी विशाखा शेळकी, तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता स्वप्नील पिदुरकर यांनी हा पुरस्कार दुर्गा शंकर मिश्रा, सचिव आवास व शहरी कार्य मंत्रालय दिल्ली यांच्या हस्ते स्विकारला.
नगर पंचायत कोरपना च्या मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी या यश प्राप्तीचे श्रेय संपूर्ण नगर वासीयांना व नगर पंचायत चे समस्त पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांना दिले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular