Thursday, March 28, 2024
Homeचंद्रपुरकळमना ग्रामपंचायत सरपंचपदी काँग्रेसचे नंदकिशोर वाढई.

कळमना ग्रामपंचायत सरपंचपदी काँग्रेसचे नंदकिशोर वाढई.

राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना ग्रामपंचायतीवर आमदार सुभाष धोटे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते राजुरा काँग्रेस कमीटीचे कार्याध्यक्ष नंदकिशोर वाढई यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महंमद अंसारी यांनी काम पाहिले. येथे ७ पैकी ४ काँग्रेस समर्थित ग्रामविकास पॅनलचे उमेदवार नंदकिशोर सुभाष वाढई (सर्वसाधारण गट), रंजना दिवाकर पिंगे (ना. म. प्र), सुनिता ऋषी उमाटे (सर्वसाधारण), कौशल्या मनोहर कावळे (सर्वसाधारण) हे सदस्य निवडून आले आहेत.


सरपंचपदी निवड झाल्याबद्दल आमदार सुभाष धोटे, जेष्ठ नेते दादा पाटील लांडे, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे तालुका अध्यक्ष रंजन लांडे, माजी उपसरपंच महादेवराव ताजने, मदन वाढई, विठ्ठल वाढई, महादेव पाटील पिंगे, कवडु पाटील पिंगे, श्यामराव चापले, सर्व विजयी उमेदवार तथा कळमना येथील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular