Thursday, April 18, 2024
Homeचंद्रपुरकंत्राटी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन

कंत्राटी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन

चिमूर- नगर परीषद क्षेत्रातील सर्व प्रकारच्या सफाई करीता निच्छित अशा कालावधी करीता विविध कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले.या कंत्राटदाराकडे नाली सफाई, घटांगाडी कामगार, सफाई कामगार तथा कचरा गाडीचे ड्रायव्हर इत्यादी काम करणाऱ्या कामगारांना अनियमीत पगार होत असल्यांने आर्थीक ओढातान सहन करावी लागते. याचा उद्रेक होऊन वेळेवर पगाराच्या मागणीसाठी सर्व सफाई कामगारांनी शनीवार ला कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेऊन नगर परीषदेपुढे ठिय्या मांडला.
नगर परीषदे मध्ये नाली सफाई ,घंटागाडी,सफाई कामगार तथा गाडीचे ड्रायव्हर असे मिळून एकुण जवळपास ७० कामगार कंत्राटदाराकडे काम करतात.

या कामाच्या मोबदल्यावर सर्व सफाई कामगारांच्या कुंटुबाचे भरण पोषण चालते.मात्र नगर परीषद क्षेत्रातील महत्वाचे काम करणारे कामगारांना नियमित मागील वर्षापासुन पगार मिळत नसल्याने त्यांना आर्थीक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे नियमित प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवळ्यात पगार देण्याची मागणी नेहमीच कंत्राटदाराला कामगाराकडून केल्या जात होती. मात्र कंत्राटदार तथा नगर परीषदेचे स्वच्छता विभाग या कामगारांच्या मागणीकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत आहे.
सफाई कामगारांच्या न्याय मागण्याकडे कंत्राटदार तथा प्रशासना कडून दुर्लक्ष झाल्याने कामगारात रोष निर्माण झाला. त्यामूळे प्रशासणाना १८ डिसेंबरला मागणी त्वरीत पुर्ण करावी अन्यथा १९ डिसेंबरला काम बंद आंदोलन करू असा इशारा वजा मागणीचे पत्र दिले .या पत्राकडेही प्रशासणाने दुर्लक्ष केल्याने अखेर सर्व सफाई कामगारांनी काम बंद करून नगर परीषदे पुढे ठीय्या मांडला या संदर्भात प्रभारी मुख्याधीकारी मंगेश वासेकर यांचेशी संपर्क साधला असता या विषयी मला माहीती नाही असे बोलले.
या आंदोलनात धर्मेंद्र उगले, विलास मेश्राम, राजकुमार मड़ावी, शशांक सहारे, राजू गड्ढे, प्रभु वाघ, विशाखा मेश्राम, मंगला सहारे विना सहारे शशीकला धोटे आम्रपाली जांभूळकर, संगीता उगले महादेव खांडरे, मनोहर सावसाकडे, विशाल मड़ावी, बादल मड़ावी, अक्षय खोबरे, शंकर भानारकर जगदीश शिवरकर यांचेसह सर्व कंत्राटी सफाई कामगार सहभागी झाले होते.
OOO
नगर परीषदेत कंत्राटी कामगार यांचे नियमीत जिपीएफ भरणे आवश्यक असते,त्या शिवाय मासीक कामांची देयके अदा केली जात नाहीत.मात्र कंत्राटदार व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने देयके अदा केल्या जाते.जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या या कामगांराच्या भविष्याचे काय? असा प्रश्न केल्या जात असुन काही व्यक्ती कचऱ्यातुनही मलिंदा खात असल्याची चर्चा आहे .
…………………. टेंडर इस्टीमेट कॉस्ट नुसार सर्व मजुरांची रोजी प्रत्येकी ५६१ आहे व ड्राव्हर ची रोजी प्रत्येकी ६७७ रुपये आहे मात्र टेंडर इस्टीमेट कास्ट नुसार मजूरांना रोजी न देता नगर परिषद क्षेत्रात लांबच्या प्रभागातील घटांगाडी चालक मजुरांना १५० रुपये स्थानीक शहरातील मंजूरांना २०० रुपये नियमीत रस्ता सफाई मजूरांना २५० रुपये नाली सफाई मजुराना ३०० रुपये रोजी देन्यात येते. अशा प्रकारचा भेदभाव कंत्राटदाराकडून होत असल्याची माहीती मजुरांनी दिली…….
…………….
” नगरपरिषद मध्ये अनेक वर्षा पासून ठेकेदार बदली चा प्रकार सुरु आहे. महीन्याला वेळेवर पगार मिळत नाही. त्यामुळे किराणा दुकानदार वेळेवर उधार देत नाही रूम चा किराया कसा द्यावा हा प्रश्न उपस्थीत होत आहे रोज च्या खान्याचे वांदे आहे कधी चुल पेटते तर कधी पेटत नाही नाही मजुरांचा इपीएफ कटत नाही यासंदर्भात ठेकेदाराला विचारले असता पगारातुन कपात करन्यात येईल अशी धमकी देते”

शशांक सहारे
सफाई कामगार न प चिमूर

Previous article
Next article
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular