Friday, April 19, 2024
Homeचंद्रपुरउमरेड राष्ट्रीय महामार्गातंर्गथ ३५३ ई सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे

उमरेड राष्ट्रीय महामार्गातंर्गथ ३५३ ई सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे

चिमूर – उमरेड ३५३ ई राष्ट्रीय महामार्गातंर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम मागील दोन वर्षा पासुन एस.एम.एस कंपनी द्वारे करण्यात येत आहे.या महामार्गाचे काम सुरू असतानाच,सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात जागोजागी भेगा पडल्या असून,काही ठिकाणी तर रोड दबल्याचे दिसुन येत आहे.यामुळे एस.एम.एस.कंपनीच्या सर्व संचालकांवर फौजदारी व इतर प्रकारची कारवाई,सबंधीत केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी करणार काय?हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.


चिमूर-उमरेड रस्त्याच्या बांधकाची वारंटी (गॅरंटी)२० वर्षा पर्यंत आहे.परंतू २० वर्षांची वारंटी असलेल्या रस्त्यावर केवळ १ वर्षातच का म्हणून जागोजागी भेगा पडल्या?का म्हणून सदर रस्ता अनेक ठिकाणी अल्पावधीतच दबलाय?हा मुद्दा कंपनीच्या काम करण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे.
आता नवीनच बांधकाम करण्यात आलेल्या सिमेंट कांक्रिट महामार्गाची दुरस्तीची कामे अनेक ठिकाणी करण्यात येत असेल तर,त्या रस्त्याचे बांधकाम हे निकृष्ठ दर्जाचे आहे हे लक्षात आल्यावाचून राहत नाही.
रस्त्याच्या दुरुस्ताई कामामुळे ३५३ ई राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम बोगस झाले आहे,असे आता समजायचे काय?हा मुद्दा अनेकांना सतावतो आहे.जर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई रोडचे काम निकृष्ठ दर्जाचे असेल तर अशा कंत्राटदारावर केंद्र सरकार कार्यवाई करणार काय?या महामार्गाच्या बोगस बांधकामावरुन एक प्रसंग आठवतो तो म्हणजे केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या बोलण्याचा!,एका कार्यक्रमात ते बोलताना ते म्हणाले होते,राष्ट्रीय महामार्गाचे बोगस काम करणाऱ्या कंत्राटदारांवर बुलडोझर चालणार व फौजदारी कारवाई करणार?
चिमूर-उमरेड महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांवर बुलडोझर चालला पाहिजे व फौजदारी गुन्हा सुध्दा नोंद झाला पाहिजे.कारण रस्ता बांधकामांसाठी लागणारा खरबो रुपयां हा केंद्र सरकारचा म्हणजे जनतेचा आहे.ठेकेदार नियमानुसार राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करीत नसेल तर अशा कंत्राटदाला अभय देण्यासबंधाने कुठल्याही प्रकारची सुट नको.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular