Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरउन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान

उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांची माहिती

चंद्रपूर : सन २०२० च्या माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर खरीप हंगामात सोयाबीन काढणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे शारिरीक पक्वतेच्या अवस्थेत बियाणे भिजले असल्याने येत्या खरीप २०२१ च्या हंगामामध्ये पेरणीसाठी वापरल्यास उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वत: उन्हाळी सोयाबीनचे बिजोत्पादन घेवून पुढील हंगामाकरिता घरच्याघरी दर्जेदार बिजोत्पादन निर्मिती करावी. त्याकरिता पुढील तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.
उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादनासाठी आवश्यक बाबी-
१. जमीन-सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे. अत्यंत हलक्या जमीनीत सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन येत नाही. जास्त आम्लयुक्त्, क्षारयुक्त तथा रेताड जमीनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. जमीनीत सेंद्रीय कर्बाची मात्रा चांगल्या प्रामाणात असली पाहिजे.
२ .हवामान-सोयाबीन हे पीक सुर्यप्रकाशास संवेदनशील आहे. सोयाबीन पीकासाठी समशितोष्ण हवमान अनुकूल असते. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिकाची कायिक वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते.सोयाबीन पीक २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते; परंतू, कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर फूले व शेंगा गळतात, शेंगाची योग्य वाढ होत नाही व दाण्याचा आकार कमी होतो.
३. वाण-पेरणीसाठी किमान ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे आवश्यक आहे. पेरणीसाठी वनामकृवि, परभणीने विकसीत केलेल्या एमएयुएस ७१ , एमएयुएस १५८ व एमएयुएस ६१२ या वाणांची किंवा महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरीने विकसीत केलेल्या केडीएस ७२६, केडीएस ७५३ या वाणांची किंवा जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविदयालय, जबलपूर ने विकसीत केलेल्या जेएस ३३५, जेएस ९३-०५, जेएस २०-२९, जेएस २०-६९, जेएस २०-११६ या वाणांची निवड कराव. वरील वाण जर शेतकरी बंधूनी खरीप २०२० मध्ये पेरलेले असतील व त्या बियाण्याची उगवणशक्ती चांगली असेल तर घरचे बियाणे स्वच्छ करून बिज प्रक्रिया करून पेरणी करावी.
४. जमीनीची पूर्व मशागत- खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर नांगरणी करून विरूध्द दिशेने मोगडणी करावी व नंतर पाटा मारून जमीन समतोल करावी.
५. बिजप्रक्रिया, पेरणी, खते व आंतरमशागत
बिजप्रक्रिया- सोयाबीनवर विविध रोग येतात व त्यामुळे सोयाबीनचे मोठया प्रमाणात नुकसान होते. रोग आल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी घेण्यापेक्षा पेरणीपूर्वी बिज प्रक्रिया केल्यास रोगाचे व्यवस्थापन व्यवस्थीतरित्या होते. सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वीच मिश्र उत्पादन कार्बोक्झीन ३७.५ % + थायरम ३७.५% ची (व्यापारी नाव-व्हिटावॅक्स पॉवर) ३ ग्रॅम प्रति कि.ग्रॅ. बिज प्रक्रिया करावी. या बिजप्रक्रियेमुळे सोयाबीनचे कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील इतर रोगांपासून संरक्षण होते. या शिवाय बिजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी (८-१० ग्रॅम/कि.ग्रॅ. बियाणे) चा वापर सुध्दा करावा. या बुरशी नाशकांच्या बिज प्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत (ब्रेडी रायझोबियम) + स्फुरद विरघळणारे जिवाणू खताची (पीएसबी) २५० ग्रॅम प्रति १० कि.ग्रॅ.किंवा १०० मिली/१० कि.ग्रॅ.(द्रपरूप असेल तर) याची बिजप्रक्रिया करावी.
पेरणी-
पेरणीची वेळ-
उन्हाळी हंगामी सोयाबीनच्या बिजोत्पादनाकरिता डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवडया पर्यंत पिकाची पेरणी करावी. जर पेरणीस उशीर झाला तर पिक फुलो-यात असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असतांना म्हणजेच मार्च व एप्रिल महिण्यात जास्त तापमानामुळे फुले व शेंगा गळ होते व दण्याचा आकार लहान होतो. त्यामुळे उत्पदनात मोठया प्रमाणात घट होऊ शकते.जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवडयात किंमान तापमान १० अंश सेल्सीअसच्या खाली गेले असेल तर पेरणी थोडी लांबवून तापमान साधारणत: १५ अंश झाल्यास पेरणी करावी. कमी तापमानात पेरणी केल्यास उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागतात.
लागवडीचे अंतर व पध्दत- सोयाबीनची पेरणी ४५x५ सें.मी. अंतरावर व २.५ ते ३.० सें.मी. खोलीवर करावी. पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोलीवर पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही.
बियाण्याचे प्रमाण-सोयाबीन लागवडीसाठी हेक्टरी ६५ कि.ग्रॅ.बियाणे वापरावे (एकरी २६ किलो)
खते-

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular