Saturday, April 20, 2024
Homeचंद्रपुरइन्स्पायर करिअर अकॅडमी येथे शिवाजी महाराज जयंती निमित्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम...

इन्स्पायर करिअर अकॅडमी येथे शिवाजी महाराज जयंती निमित्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

ब्रम्हपुरी:-

स्थानिक इन्स्पायर करिअर अकॅडमी येथे शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम तथा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.प्रकाश इंगळे ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुणे, मा.राहुल पिसाळ ,प्रशासकीय अधिकारी न.प.ब्रम्हपुरी, हे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून मा.एकता गुप्ता, प्राचार्य लिटिल फ्लॉवर स्कुल,ब्रम्हपुरी, मा.दीपक सेमस्कर सर मार्गदर्शक इन्स्पायर करिअर अकॅडमी ब्रम्हपुरी प्रा. लक्ष्मण मेश्राम संचालक इन्स्पायर करिअर अकॅडमी ब्रह्मपुरी, प्रा. तेजस गायधने, प्रा. दीपा मेश्राम, विवेक खरवडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .

त्यानंतर प्रा . प्रवीण कामथे व प्रा.लक्ष्मण मेश्राम यांनी संकलित केलेले आणि साई ज्योती पब्लिकेशनचे सामान्य ज्ञान या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शनात राहुल पिसाळ यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे प्रकाश इंगळे यांनी शिवाजी महाराजचं आदर्श घेऊन स्पर्धा परिक्षेची तयार केल्यास नक्कीच यश मिडेल असे प्रतिपादन केले यावेळी दीपक सेमस्कर सर व एकता गुप्ता यांनी सुद्धा विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणात प्रा.जेंगठे सर यांनी वर्तमान परिस्थितीचा विचार करून अभ्यास करावा असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्पायर अकॅडमी चे संचालक प्रा. लक्ष्मण मेश्राम यांनी केले सूत्रसंचालन स्वाती लाकडे तर आभार प्रदर्शन अश्विनी भैसारे हिने केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर हलदार राजदीप मेश्राम श्रेयश मांढरे विकास मेश्राम सोनाली ठाकरे पल्लवी खेत्रे मंगला गुरनुले इत्यादींनी सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular