Thursday, April 18, 2024
Homeचंद्रपुरआजाराने मृत्यू पावलेल्या अनाथ वयोवृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी धावून आले युवा मित्र

आजाराने मृत्यू पावलेल्या अनाथ वयोवृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी धावून आले युवा मित्र

भद्रावती ता प्र :- भद्रावती शहरातील स्थानिक भवानी माता मंदिरासमोर नेहमी भीक मागण्यासाठी बसत असलेल्या सरस्वती कांबळे यांचा दि. ४ जुले ला सकाळी. १ .४५ वा आजाराने मृत्यू झाला.
त्या नेहमी भवानी माता मंदिर समोर भिक मागत असायच्या काही महिन्यापूर्वी त्या आजारी पडल्या होत्या त्यावेळी याच युवा मित्रांनी तिला रुग्णालयात दाखल करून तिचा प्राण वाचविला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच तिला अति आजार झाल्याने तिचा मृत्यू झाला.


ती अनाथ असल्याने तिचा अंत्यसंस्कार कोण करणार याकडे कुणाचेही लक्ष नव्हते मात्र या घटनेची माहिती मिळताच युवा मित्रांनी मृतदेह पडलेल्या जागेवर जाऊन तिला फुल हाराने सजवून बँडच्या माध्यमातून तिरडी सजवून तिचा अंत्यसंस्कार जैन मंदिर मागील स्मशानभूमीत अतिशय आदराने केला. यावेळी नितेश बानोत, जयंत बेरड अमनसिग राजपूत, रोहित स्वान, भूषण पारखी, ऋषिकेश नदीनरु, आतिश डोंगरे, जीवन शैताने, सागर पढाल, राहुल पेशने, सागर पढाल, सूरज शेट्टी, अजित अवताडे, अनिकेत चापले, सागर बुच्चे तसेच मित्र परिवार उपस्थित होता.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular