Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरअन् चक्क! विवाह सोहळ्यातून दिला जनजागृतीचा संदेशओबीसी जनगणना काळाची गरज

अन् चक्क! विवाह सोहळ्यातून दिला जनजागृतीचा संदेश
ओबीसी जनगणना काळाची गरज


ब्रह्मपुरी( विनोद दोनाडकर)


दोन जीवांचे जिव्हाळ्याचे मनोमिलन म्हणजे लग्न! धकाधकीच्या जीवनात कोणी कुणाला विचारायला तयार नसतात मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीने संपन्न झालेला आपला लग्न सोहळा जन सामान्य लोकांच्या आठवणीत राहावा यासाठी काही युवक प्रयत्न करताना दिसत आहेत
ओबीसी जनगणना ही काळाची गरज असून ती झालीच पाहिजे असे आशय घेऊन चक्क! संदेश लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमातून दिलाय ब्रह्मपुरी तालुक्यातील कोल्हारी येथील वर नूतन शंकर प्रधान तर लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला येथील वधु दीप्ती विलास सहारे यांनी ! दिनांक 21 फेब्रुवारीला साडेचार वाजता दीप्ती आणि नूतन यांचा लग्न सोहळा पार पडला कोरोना काळातही मोजक्या पाहुणेमंडळी व मित्र-मैत्रिणीच्या उपस्थित सोशल डिस्टंसिंग पाडणे ,माक्स लावणे, व सॅनिटायझर वापर करून शासनाने ठरवलेल्या नियमाचे पालन करण्यात आले सदर लग्न सोहळा कोल्हारी येथील दशरथ तलमले यांच्या निवासस्थानी रितीरिवाजाप्रमाणे न करता ओबीसी जनगणनेवर लक्ष केंद्रीत करुन लग्नातून चक्क !संदेश दिल्याने नूतन आणि दीप्ती ह्या नव दांपत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular