Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरअग्निशमन कंत्राटी कामगारांचे बल्लारपूर नगरपरिषदेकडून आर्थिक शोषण

अग्निशमन कंत्राटी कामगारांचे बल्लारपूर नगरपरिषदेकडून आर्थिक शोषण

कामगारांना किमान वेतन अधिनियम नुसार वेतन देण्याची राजु झोडे यांची मागणी

 बल्लारपूर: बल्लारपूर नगर परिषद अंतर्गत बल्लारपूर अग्निशमन विभागात जवळपास १४ कंत्राटी कामगार काम करतात. सदर कामगार गेली अडीच ते तीन वर्ष आपली सेवा देत आहेत. मात्र फक्त त्यांना किमान आठ हजार वेतन देऊन कंत्राटदार आपले हित साधत आहे. कंत्राटदार आपल्या मर्जीने वेतन देत असून कामगारांची मुस्कटदाबी करत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून कामगारांचे आर्थिक शोषण  नगरपरिषद करत आहे असा आरोप संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केला आहे.
  अग्निशमन दलात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण थांबवून त्यांना किमान वेतन अधिनियमानुसार वेतन देण्यात यावे ते व त्यांचे आर्थिक शिक्षण बंद करावे ते व तात्काळ पगार वाढ करावी अशी मागणी राजू झोडे यांनी संबंधित प्रशासनाला केली.
       अग्निशमन दलाच्या कामगारांनी राजू झोडे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली.जर मिनीमम वेजेस नुसार संबंधित कामगारांना आर्थिक वेतन दिले गेले नाही तर कामगारांच्या समर्थनार्थ उलगुलान संघटना आक्रमक पवित्रा घेणार व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करणार असा इशारा कामगारांनी नगर परिषद प्रशासनाला दिला.

निवेदन देतांना उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे, सागर नगराळे, शुभम कनोजवार, नमित डांगे, नितीन नेवारे, विजय खोब्रागडे, अनिल कश्यप, विकास करमरकर, हरिओम मडावी, शुभम निखाडे, मुकेश मून, तथा अग्निशमन दलाचे अन्य कामगार उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular