आर्वी : स्थानिक माॅडेल हायस्कूल येथे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या 1972 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि. 28 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी माजी विद्यार्थ्यी व त्यांचे वर्ग शिक्षक मोरेश्वरराव दाते यांनी शाळेला 5 टी. व्ही.संच भेट दिले.त्याचप्रमाणे शाळेचे शिक्षक प्रेमकुमार चोपडे, श्री अजाबराव रानोटकर व विजय गवळीकर यांनी 2 टी.व्ही. संच भेट देऊन शाळेप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. या भरीव मदतीमुळे शाळेला 7 वर्ग खोल्यांमध्ये डिजिटल क्लास रूम तयार करता आल्या. यापूर्वी शाळेच्या 4 वर्ग खोल्या डिजिटल झालेल्या आहे. एकंदर 11 वर्ग या प्रकारे डिजिटल झालेल्या असून, माजी विद्यार्थ्यी मेळाव्याचा औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी या सर्व डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटनाचा कार्यक्रम मुख्याध्यापक रविंद्र खेडकर यांचे अध्यक्षतेखाली, भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष संदीप काळे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
संस्थेचे अध्यक्ष ऍड. भैयासाहेब काळे व सचिव शोभाताई काळे यांनी कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित राहून समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी संदीप काळे यांनी क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून बघावे आणि क्रिडा क्षेत्राच्या विकासाकडे विषेश लक्ष द्यावे असे सूचित केले.
माजी विद्यार्थ्यी मेळाव्यानिमित सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र सुपनर यांनी, प्रास्ताविक प्रवीण होरे यांनी तर आभार प्रदर्शन सुनिता कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.