दोन परिचारिकां सह गर्भपात केंदाच्या संचालिकेला घेतले ताब्यात
पोलीस अधीक्षकांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती
आर्वी :- तेरा वर्षीय मुलीच्या अवैध गर्भपात प्रकरणी कदम हॉस्पिटल येथे दिनांक 12 जानेवारी रोजी तपासणी केली असता दवाखान्याच्या मागील बाजूस बंद असलेल्या गोबर गॅसच्या खड्ड्यांमध्ये अकरा कवट्या व 54 हाडे प्राप्त झाले असून विश्लेषना कारिता नागपूर केमिकल टेस्टिंग करता पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी स्थानिक पोलीस स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

नऊ जानेवारीला पीडिताच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तपास केला असता पीड़ितेचा अवैधरीत्या गर्भपात कदम हॉस्पिटल मधे करण्यात आला. या प्रकरणी मुलाचे आई-वडील व डॉक्टर रेखा कदम यांना अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर उभे केले असता आई-वडिलांना न्यायालीन कस्टडी तर डॉक्टर रेखा कदम यांना दोन दिवस पोलिस कस्टडी तर 12 तारखेला त्यांना न्यायालयीन कस्टडी सुनावण्यात आली.आज दि. 13 जानेवारी रोजी दोन महिला परिचारिकांना ताब्यात घेण्यात आले. कदम हॉस्पिटल मधील गर्भ पात केंद्राच्या संचालिका यांना चौकशी करिता ताब्यात घेतले असता रक्त दाब वाढल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कदम हॉस्पिटल परिसराची पाहणी व तपासणी केली असता मागील भागात वरिल अवशेष आढळून आले .
कदम हॉस्पिटल मध्ये करण्यात आलेल्या गर्भपाताच्या संबंधित अभ्रकाची कायदेशीर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यात आलेली नाही असे आढळून आलेले आहे. पुढील तपास सुरू आहे . गर्भपात रजिस्टर मध्ये आठ लोकांच्या गर्भपाताची नोंद असून प्रत्यक्षात अकरा कवट्या सापडल्यामुळे डीएनए तपास करण्याकरीता विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. अशी माहिती सुद्धा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिली.