2 लाखाची चोरी 65 हजाराच दाखल : कारंजा पोलीस स्टेशन मधील प्रकार
धोंडी काढलेल्या लोकांवर नागरिकांचा संशय
कारंजा (घा) ; तालुक्यातील नारा येथे काल पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास चोरट्याने धुमाकूळ घातला यात अनेकांच्या घराचे बाहेरून दरवाजे लावण्यात आले. येथील शालिकराम हिंगवे यांच्या घरातील कपाटातून 2 लाखाची चोरी करण्यात आली. याबाबत कारंजा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस ठाण्यात 65 हजारच रुपये चोरी गेल्याची तक्रारीत दाखल करण्यात आली आहे. यामुळे तक्रारदार अचमबीत झाला आहे.

दोन लाखाच्या चोरीच्या रक्कमेत तफावत दाखवत 65 हजाराची चोरी झाल्याची पोलीस दाखवत असल्याने यात फिर्यादीने सांगितले की माझ्या घराच्या कपाटातून दोनच लाख चोरीला गेले, मात्र पोलीस प्रशासन म्हणतात की, 65 हजार रुपयांची चोरी झाली . आता खर कोनाचे समजावे हा प्रश्न आहे. सुदैवाने या चोरीची घटना उघडकीस आल्यास यातील उर्वरित रक्कमचे मालक कोण होणार हा आता प्रश्न पडला आहे. याबाबत फिर्यादी यांना विचारणा केली असता मी विकलेला कापसाची अडीच लाख रक्कम काही दिवसांपूर्वी घरी आणली . त्यातील 50 हजार रुपये शेतीसाठी लावण्यात आले. त्यातील 2 लाख रुपये कपाटात ठेवण्यात आले. मात्र अज्ञात चोरट्याने घरात घुसून कपाटातून 2 लाख रोख रक्कम चोरून नेले याबाबत पोलीस ठाण्यात एवढीच रक्कम चोरी गेल्याचे सांगितले, त्यावेळी त्यांना कापूस विकल्याचे बील ही दिले मात्र, त्यांनी 65 हजार रुपये चोरी गेल्याची तक्रारीत दाखल केल्याने नवलच वाटत आहे.असे शालीकराम हिंगवे यांनी सांगितले.
चोरीतील रक्कमेची तफावत ठेवण्याचे पोलिसांचे उदिष्ट काय
नारा येथील शालीकराम हिंगवे यांच्या घरातील कपाटातून चोरी गेलेल्या रक्कममधून 1 लाख 35 हजाराची तफावत ठेवून 65 हजार चोरी गेल्याची नोंद ठाण्यात करण्यात आली यावरून पोलिसांचे उदिष्ट काय या चर्चेला उधाण आलं आहे.
आमच्या घरातील कपाटामधून2 लाखाची चोरी झाली नातू आणि आजोबा पोलिसात तक्रार द्यायला गेले, मात्र तिथे 65 हजार चोरी गेल्याचे लिहले, बाकीचे पैसे कोण देणार का त्यांनी कमी पैश्याची चोरी लिहली येथेही आमची फसवणूक केली असा प्रश्न लिलाबाई हिंगवे यांनी केला.
बाहेर गावातून धोंडी काढायला आलेल्यावर संशय
आमच्या गावात दोन दिवसापूर्वी पाऊस येण्यासाठी बाहेर गावातली दोन ते चार जणांनी येऊन धोंडी काढली त्यांच्याकडे चारचाकी वाहन होते प्रत्येक घरी जाऊन त्यांनी पैश्याची मागणी करायचे आणि धान्य मागायचे जवळपास एका घरी 15 ते 20 मिनिटे थांबायचे त्यामुळे धोंडी काढलेल्या लोकांनीच आमच्याकडे चोरी केली असावी असा संशय व्यक्त केला.