- तिन आरोपींना केली अटक
समुद्रपुर:-
तालुक्यातील गिरड कोरो रस्त्यावरील साखरा शिवारात गिरड पोलीस सापळा रचून ३० लाख रुपये किंमतीची अवैध वाहतूक होत असलेला विदेशी दारूचा साठा जप्त करीत तिन आरोपींना अटक केली.

प्राप्त माहितीनुसार नुसार १६ जानेवारी शनिवारी रात्री २ व वाजताच्या सुमारास गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार महैंद्र सुर्यवंशी यांनी गिरड कोरा मार्गाने एका आयशर ट्रक मध्ये नागपुर कडून चंद्रपूरकडे अवैध दारू वाहतूकी होते असल्याची गुप्त माहिती मिळाली असताना त्यांनी गिरड कोरा मार्गावरील साखरा शिवारात सापडा रचून गिरड कडून कोऱ्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या आयशर ट्रक क्रमांक सि.जी ०४ एम.टि.४७९४ ला थांबवून त्याची पाहणी केली असता या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारुचा जखीर आढळून आला.यावेळी पोलिसांनी वाहन व वाहनात असले आरोपी अक्षय नानाजी पोटफोडे,वय २६ वर्ष राहणार हनुमान वार्ड हिंगणघाट,कुंदन नामदेवराव खडसे वय ३१ वर्ष राहणार निशानपुरा हिंगणघाट,जोयाफ खा युसूफ खा वय ३१ राहणार हिंगणघाट शास्त्री वार्ड हिंगणघाट या तिद्यांना ताब्यात घेतले.यावेळी वाहनांची सखोल तपासणी केली असता.या वाहनात हायवर्ड कंपनीची बियर ५०० मि.ली.७५ बाक्स किंमत ३ लाख २४ हजार,राॅलय स्टेज डिलक्स व्हिस्की कंपनीचे ७५० मि.ली.मध्ये ५ बाॅक्स किमंत ६० हजार रुपये,राॅलय स्टेज डिलक्स व्हिस्की कंपनीचे १८० मि.ली.मध्ये ४० बॉक्स किंमत ४ लाख ८० हजार रुपये,ईम्परीअर ब्लू कंपनीचे १८० मि.ली मध्ये ५ बाॅक्स किमंत ४८ हजार रुपये, मॅकडान कंपनीचे १८० मि.ली.मध्ये ९० बॉक्स किंमत ८ लाख ६४ हजार रुपये,स्टरीलींग कंपनीचे ५ बॉक्स किंमत १ लाख ८०० रुपये एकुण किंमत १८ लाख ८४ हजार रुपये व आयशर ट्रक किंमत १२ लाख रुपये व तिन आरोपी जवळील १५ हजार रुपये किंमतीचे मोबाईल नगदी असा ३० लाख ९९ हजार रुपये किंमतीची मुद्देमाल पोलिसांनी जप्त करीत आरोपी अक्षय नानाजी पोटफोडे,वय २६ वर्ष राहणार हनुमान वार्ड हिंगणघाट,कुंदन नामदेवराव खडसे वय ३१ वर्ष राहणार निशानपुरा हिंगणघाट,जोयाफ खा युसूफ खा वय ३१ राहणार हिंगणघाट शास्त्री वार्ड हिंगणघाट या तिद्यांना अटक केली आहे.यावेळी आरोपींना विचारपूस केली असता हा दारूसाठी नागपूर वरून चंद्रपुरला नेत असल्याची माहिती दिली आहे.
हि कारवाई गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार महैंद्र सुर्यवंशी पोलिस कर्मचारी
प्रमोद सोनोनै,नरेंद्र बेलखेडे,रवि घाटुरले,राहुल मानकर,,प्रशांत ठोंबरे महैंद्र गिरी रवि घाटुरले आदींनी केले आहे.