Saturday, June 25, 2022
Homeवर्धाहिंगणघाट शहर भाजपा यांचे उपविभागीय अधीकार यांना निवेदन

हिंगणघाट शहर भाजपा यांचे उपविभागीय अधीकार यांना निवेदन

तालुका प्रतिनिधी
योगेंद्र वाघमारे
हिंगणघाट

हिंगणघाट शहरातील भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की जिल्हाधिकाऱ्यांच्या वर्धा यांच्या आदेशान्वये सर्व दुकाने भाजीपाला व फळे व इतर जीवनावश्यक वस्तू चा प्रचंड तुटवडा लोकांना सहन करावा लागत आहे करण घरपोच डिलिव्हरी हा तोडगा हिंगणघाट सारख्या लहान गावात ज्या ठिकाणी मजूर व कष्टकरी नागरिक जो मजुरी करून उदरनिर्वाह करतात ते नागरिक एक किलो साखर व एक पाव चहापत्ती खरोखरीच दुकानदार त्या ग्राहकांना घरपोच सेवा कशी काय पुरवनार अशा अनेक महत्त्वाच्या बाबी आहे सोबतच ज्या शेतकऱ्यांना बी बियाणे व रासायनिक खताची मागणी आहे ती सुद्धा आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बाधा वर पोहोचविणे अशक्य असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना शेती करिता उपयोगी येणारे साहित्य बी बियाणे व रासायनिक खत त्यांना दुकाना मधूनच देणे सोईस्कर राहील कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये रोड नसल्यामुळे व पावसाळ्यात चिखल होत असल्यामुळे त्यांच्या बांधावर शेती करिता उपयोगी येणारे साहित्य बी बियाणे व रासायनिक खत यांच्या बांधल्यावर पोहोचणे अशक्य असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्यात त्यांना उपयोगी येणारे सर्व साहित्य त्यांना दुकानातूनच द्यावे तरी आपण मागील वर्षी प्रमाणे प्रत्येक दुकानासमोर सर्कल आखून नियमांचे कडक पालन करुन दैनंदिन व आवश्यक त्या असलेल्या वस्तू करिता काही दिवस व वेळ ठरवून दिल्यास लोकांना दिलासा मिळेल तरी आपण हिंगणघाटच्या जनतेची जीवनावश्यक वस्तू वितरणाची सोय कोविड नियमाचे पालन करून व सोशल डिस्टंसिंग चे पालन करून व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आम्ही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देते वेळीस नगराध्यक्ष प्रेम बसतांनी,प्रदेश सचिव अंकुश ठाकूर,जिल्हा महामंत्री किशोर दिघे , जिल्हा सचिव सुभाष कुंटेवार , अल्पसंख्याक आघाडी चे जिल्हा अध्यक्ष बिस्मिल्ला खान , शहर अध्यक्ष आशिष प्रबत ,शहर उपाध्यक्ष अविनाश आईटलावार , हिंगणघाट ग्रामीण अध्यक्ष आकाश पोहणे,समुद्रापूर ता अध्यक्ष संजय डेहणे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular