तालुका प्रतिनिधी
योगेंद्र वाघमारे
हिंगणघाट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हिंगणघाट शहर परिसरात मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या हस्ते संत तुकडोजी वार्ड,लक्ष्मी मंदीर परिसर,सातेफळ रोड,माडा कॉलनी शिव मंदिर परिसर अशा प्रत्येक वॉर्डात निःशुल्क (मोफत) ट्यंकर ने पाणी पुरवठा करण्यात आला. हिंगणघाट शहरात एप्रिल, मे या महिन्यात भीषण पाणीटंचाई असते त्यामुळे शहरातील जनतेला पाण्या अभावी वंचित राहावे लागते याकडे मात्र नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष आहे आई, भगिनींना लाबून – लाबून पाणी आणावं लागतं दरवर्षी या दोन महिन्यात नागरिकांना पाण्या अभावी झळ सोसावी लागते. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव जनतेच्या पाठीशी असते.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ‘मनसे’ ने निःशुल्क पाणी पुरवठा वार्डा वॉर्डात पोहचता सुरू केले आहे हा पाणी पुरवठा महिनाभर सुरू राहील असे प्रतिपादन मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी यावेळी केले.