Saturday, June 25, 2022
Homeवर्धाहिंगणघाट येथे सेवा फाउंडेशन द्वारा रक्तदान शिबीर

हिंगणघाट येथे सेवा फाउंडेशन द्वारा रक्तदान शिबीर

तालुका प्रतिनिधी
योगेंद्र वाघमारे
हिंगणघाट

सेवा फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर अनुसया पॅलेस सभागृहात पार पडले.
देशात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे राज्यात कोरोना महामारीमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे याचे गांभीर्य लक्षात घेत सेवा फाउंडेशनच्या युवकांनी शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.


कार्यक्रमाची सुरुवात सर्व रक्तदात्यांना मास्क घालून, हाताला सॅनिटायझर लावून, एकमेकात ६ फुटाचे सोशल अंतर ठेवून रक्तदान करण्यात आले. सेवा फाउंडेशनच्या युवकांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराला प्रतिसाद देत १०० हुन अधिक युवकांनी रक्तदान देऊन कोविड 19 पिडितांसाठी आपले योगदान दिले.या कार्यक्रमाला आमदार समीर कुणावर, नगराध्यक्ष प्रेम बसतांनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
रक्तदान शिबिराला महेश घुमडे,अक्षय चंदनखेडे,युवराज खाटीक,उदयराज भोसले,आकाश वागदे,प्रणित झोरे,शुभम खाटीक,आनंद मानकर,स्त्यालक्ष जवादे,रोहित तिजारे,खुशाल घोडे,आचल वनकर,मिनल निखाडे आदी युवक व मित्रपरिवार उपस्थित होते

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular