वाढत्या ग्लोबल वार्मिंग मुळे पक्षांवर येत आहे संकट
तालुका प्रतिनिधी
योगेंद्र वाघमारे
हिंगणघाट
निसर्गात मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यांनाही ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसत असून, पाण्याअभावी चक्कर येऊन पडणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढत आहे,तपमानाची चाळीशी गाठली आहे तर वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पक्षांवर येत आहे संकट,त्यातच ग्रामीण भागातील पाणवठे कोरडे पडू लागल्याने पाण्याच्या शोधात पक्षी शहराकडे धाव घेत आहेत.

रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या कोकिळा हा पक्षी,पक्षी प्रेमी यांना दिसताच त्यांनी त्याचा जवळ जाऊन पहिले असता तो चक्कर येउन पडल्याचा त्यांच्या लक्षात आले,त्यांनी जवळ असलेले पाण्याची बॉटलीचे पाणी कोकिळा च्या अंगावर टाकले व पाणी पाजले,काही वेळ थांबून लक्ष दिले त्यातच काही क्षणातच कोकिळा हा पक्षी उडून गेला, तेव्हा पक्षी प्रेमींना कळले कि
कोकिळा हा पक्षी चक्कर येऊन पडल्याचे निदर्शनात आले.
कोकिळा हा पक्षी उन्हाळ्यात जास्त दिसतो तर एकीकडे तिचा सुंदर आवाज लोकांना आनंददायी वाटतो.
तापमान नियंत्रण करण्यासाठी पक्ष्यांमध्ये स्वेदग्रंथी नसतात, त्यामुळे पक्ष्यांना घाम येत नाही. अशावेळी पक्षी त्यांच्या शरीरातली जादा उष्णता श्वासोच्छवासाद्वारे बाहेर टाकतात.पण त्यामुळे त्यांच्या हृदयाची धडधड वाढते, शरीरातली जास्त ऊर्जा खर्च होते. अशाप्रकारे शरीरातली जास्त ऊर्जा खर्च झाल्यास आणि पाणी प्यायला न मिळाल्यास पक्षी उष्माघाताने मरण्याचीही शक्यता असते.
पक्ष्यांची लोकसंख्या वाढत्या प्रदूषण व ग्लोबल वॉर्मिंग मुळे कमी झाली असून बरेचसे पक्षाच्या प्रजाती दिसेनासे झाले आहे.पक्षीप्रेमी रोशन नागमोते व अंकुश ढोरे यांनी माणुसकीची जाण ठेवत कोकिळा पक्षाला जीवनदान दिले.