Monday, June 27, 2022
Homeवर्धाहिंगणघाट येथे ओ बी सी मोर्चा,उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

हिंगणघाट येथे ओ बी सी मोर्चा,
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

हिंगणघाट - ओबीसी ची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या प्रमुख मागणी सह विविध मागण्या संदर्भात ओ बी सी मंच हिंगणघाट चे वतीने ओबीसी मंच अध्यक्ष मंगला ठक यांचे नेतृत्वात दिनांक ७ जानेवारी रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले .यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

ओ बी सी ची जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओ बी सी च्या आरक्षणाला धक्का लावू नये शेतकरी वर्गाला न्याय मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्या ओ बी सी मंच च्या आहेत वतीने हिंगणघाट चां वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला या वेळी अनेक संघटना , सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते . सकाळी १०वाजता स्थानिक आंबेडकर चौक येथून निघालेला मोर्चा बस स्टॉप, आंबेडकर चौक, विठोबा चौक, तुकडोजी चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयात मोर्चा पोहचला. येथे मंच च्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .त्यानंतर तहशील कार्यालयात निवेदन देऊन मोर्चाला विराम देण्यात आला तत्पुर्वि विविध ओ बी सी नेत्यांची भाषणे देऊन मार्गदर्शन केले. मोर्च्यात अध्यक्ष शकील अहमद, उपाध्यक्ष प्रकाश भलमे,सचिव श्याम इडपवार,महिला अध्यक्षा मंगला ठक, उपाध्यक्षा रागिनी शेंडे,महिला सचिव सविता धोटे सह मोठ्या संखेने नागरिक सहभागी होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular