Monday, June 27, 2022
Homeवर्धाहिंगणघाट ची परिस्थिती आटोक्याबाहेर,रुग्ण व मृत्यू दरात होत आहे रोजची वाढ

हिंगणघाट ची परिस्थिती आटोक्याबाहेर,रुग्ण व मृत्यू दरात होत आहे रोजची वाढ

शहरात झाले भीतीचे वातावरण

हिंगणघाट
भारतातील गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगणघाट ची परिस्थिती दिवसेंदिवस आटोक्याचा बाहेर जाताना दिसून येत आहे.


रोजचे रुग्ण व मृत्यूसंकेत देखील वाढ होताना दिसून येत आहे.
मागील काही दिवसात दररोज शंभर आकडाचा वर जात आहे, मृत्यू देखील रोज होत असुन मृत्यूदरात वाढ होत आहे.
नागरिकांचे देखील सहकार्य दिसून येत राहिला नाही.
मागील वर्षीपासून कोरोनाने कहर केला असून, मध्यंतरी काही महिन्यांत स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत होते.मात्र,पुन्हा मागील काही दिवसात एकदा कोरोनाने डोके वर उंचावले असून, कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. देशात सर्वात गंभीर स्थिती महाराष्ट्राची असून
त्याचे पडसाद आता वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात दिसून येत आहेत.मागील वर्षी नव्हती तेवढी रूग्ण संख्या यंदा हिंगणघाट शहरात नोंदवली जात आहे,कोरोना मुळे रोज मृत्यु होत आहे.यामुळेच आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे.प्रशासनाने अजून ठोस पावले उचलण्याची गरज दिसून येत आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला असुन, यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.
मात्र हिंगणघाट शहरात अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे.त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील हिंगणघाट शहरात नागरिक किराणा दुकानाबाहेर,भाजी मार्केटमध्ये,पान टपरी, समाज मंदिर व रस्त्यावर वर मोठी गर्दी करत आहे या करिता अजून नियम अधिक कठोर करण्याचे गरज दिसून येत आहे.
मात्र कडक निर्बंध लावून देखील कोरोनाची साखळी तुटत नसल्याने आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करावा अशी मागणी जोर धरू लागली असुन वर्धा जिल्ह्यात अजून खडक निर्बंध लावावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे.
आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे.ऑक्सीजन, ऑक्सीफ्लोमीटर,रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा,डॉक्टर्स व परिचारिकेची कमी निर्माण झाली आहे असं स्पष्ट दिसून येत आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला असुन, यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण झाला आहे.
हिंगणघाट शहरातील अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे.त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
प्रशासनाने यावर कठोर निर्बंध घालून उपाययोजना करावी अशी मागणी हिंगणघाटचे नागरिक करत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular