Monday, June 27, 2022
Homeवर्धास्वबळावर लढण्याची तयारी ठेवा - पालकमंत्री सुनील केदार.

स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा – पालकमंत्री सुनील केदार.

समुद्रपुर :

        स्वाभिमानाने आघाडी होत नसेल तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा.असे प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करताना केले. काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीना प्रत्येकी दहा लाख रुपये विकास निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. शहरातील गोल्हर सभागृहातील 'गाव तेथे काँग्रेस ' या अभियानाचा समुद्रपूर तालुक्यातुन प्रारंभ करण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

आ. रांजितददा कांबळे, प्रफुल गुडधे पाटील, जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष मनोज चांदूरकर, महिला अध्यक्ष हेमलता मेघे, किसान काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष प्रवीण उपासे, डॉ. रामकृष्ण खुजे, मुरलीधर पर्बत, चांदुभाऊ कुबडे, श्याम देशमुख, तालुका अध्यक्ष विनोद हीवंज, महिला अध्यक्ष गायत्री गावंडे, प्रकशचंद्र डफ सुरेश दांगरी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सूत्रसंचालन समुद्रपुर शहर अध्यक्ष संदीप देरकर यांनी केले, प्रास्ताविक जिल्हा पदाधिकारी डॉ .रामकृष्ण खुजे यांनी केले, प्रवीण उपासे यांनी आभार मानले. आयोजनासाठी परेश बाभुळकार,संजय उरकुदे, रवींद्र लांबट, भोला भोयर, प्रफुल ऊसरे, सुभाष चौधरी, ईश्वर सूपरे, नवघरे, सोनम मेंढे रेखा तेलतुंबडे, जोत्सना टिपले, आदींनी सहकार्य केले, यावेळी परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular