Monday, June 27, 2022
Homeवर्धासोयाबीन बीज प्रक्रियेसाठी कृषि सखीचा पुढाकार.

सोयाबीन बीज प्रक्रियेसाठी कृषि सखीचा पुढाकार.

तुळजापूर.(व): महाराष्ट्र ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत शुद्ध बीज आणि अर्काचे प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम तुळजापूर येथील कृषि सखी विजया रोकडे करीत आहे.


खरीप हंगामाला सुरूवात होनार आहे. सोयाबीन ,कपासी, तुर या परंपरागत प्रमुख पिकांची पेरणी आणि लावणी करण्यात येणार आहे.पिकांचे बाबतीत मागच्या वर्षीचा कडू अनूभव शेतकऱ्यांच्या पदरी आहेच.सोयाबीनने बळीराज्याच्या डोळ्यात पाणी आणले होते.साठ टक्के सोयाबीन पेरणी नंतर उगवलेच नाही. तर काहींच्या शेतात विरळ उगवले . चांगल्या सोयाबीनच्या बीजाची उगवण क्षमता.(शक्ती. )कसी तपासावी यासाठी तसेच किटकनाशके फवारणीसाठी निंबोळी अर्क या सह जिवाम्रूत कसे तयार करायचे.याचे रीतसर प्रात्याक्षिक तुळजापूर येथील प्रभाग क्र.दोन मध्ये देण्यात आले.शेतकऱ्यांना याचा वापर करण्याचा सल्ला दिला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular