Tuesday, June 28, 2022
Homeवर्धासेलू येथे धरणे व निदर्शन आंदोलन

सेलू येथे धरणे व निदर्शन आंदोलन

सेलू:-
वर्धा येथे पोलीस कल्याण निधी द्वारा स्थापित पेट्रोल पंप रद्द व्हावा या मागणी करिता आंबेडकरी समाजाच्या वतीने आज सेलू तहसील कार्यालयापुढे धरणे व निदर्शन आंदोलन करण्यात आले.


वर्धा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलीस कल्याण निधी साठी पेट्रोल पंम्प स्थापन करण्याचे काम सुरू आहे. हा पेट्रोल पंप येथून हटवून दुसऱ्या जागी घ्यावा या मागणीसाठी वर्धा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचाच एक भाग म्हणून आज सेलू तहसील कार्यालयापुढे धरणे देण्यात आले व प्रशासनाच्या विरोधात निदर्शन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या , जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या.यावेळी तालुक्यातील विविध गावातून कार्यकर्ते गोळा झाले होते. यावेळी मनोज कांबळे,अतुल दिवे, प्रशांत भगत,अमित देशभ्रतार,सिद्धार्थ मेश्राम, सुनील वनकर ,दिलीप पाटील,सोपान टेम्बुरने,भानुदास मेश्राम,ताराचंद पोपटकर,अरुण साखरकर,सुधाकर बेसिकर,शंकर भाजीखाये,आशिष लोखंडे सेलूच्यां नगरसेविका वैशाली पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नायब तहसीलदार किशोर शेंडे यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले.यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular