वर्धा जिल्ह्यातील सिट्रस ईस्टेट फळ रोपवाटिका तळेगाव (शा.पंत)येथे मंजूर असूनही मात्र गेल्या एक वर्षापासून अंमलबजावणी कासवगतीने होतअसल्यामुळे तळेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रुपेश बोबडे सह इतर शेतकऱ्यांनी सिट्रसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी(सिट्रस इस्टेट) तथा तालुका कृषी अधिकारी सिद्धाप्पा नडगेरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

याबाबत असे की, संत्रा उत्पादक शेतकरी ,अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सिट्रस इस्टेट प्रकल्प असून आर्वी, आष्टी,कारंजा या तालुक्यासह वर्धा जिल्ह्यासाठी भूषणावह असलेला प्रकल्प पूर्ण होण्यासाठी परिसरातील शेतकरी आतुर आहे. सदर प्रकल्प 11 कोटी रुपयाचा असून त्यासाठी एक कोटी रुपये निधी जमा झाला असून रजिस्टेशन अभावी अखर्चित आहे. त्यामध्ये उच्च तंत्रज्ञानाधारित रोपवाटिका स्थापन करणे, प्रशासकीय इमारत बांधकाम, कार्यालय, प्रयोगशाळा प्रशिक्षण भवन, निविष्ठा विक्री केंद्र (फर्निचर व विद्युत जोडणी खर्चासह) कलेक्शन, ग्रेडिंग, कोटिंग, पॅकिंग, साठवणूक युनिट ची स्थापना करणे, आवश्यक अवजारे व व यंत्रसामग्री ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत सर्व अवजारे आधुनिक फवारणी यंत्र, छाटणी यंत्र, पावर टिलर इत्यादी सह बँक स्थापन करणे प्रयोगशाळा(माती पाणी उती व पाने) चाचणी प्रयोगशाळा आणि जिवाणू खते उत्पादनासाठी लागणारे साहित्य स्थापन करणे संशोधन व निवड पद्धतीने संत्र्याचे वाण विकसित करणे, खेळते भांडवल, शेतकरी प्रशिक्षण, तंत्रज्ञान प्रात्यक्षिके,संकीर्ण खर्च इत्यादी बाबी सिट्रस इस्टेट अंतर्गत समाविष्ट आहे त्यामुळे पुढील 45 दिवसात त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी तळेगाव(शा.पंत) येथील (गुरुदेव पॅनल) ग्रा.पं. सदस्यांनी निवेदन देऊन केली आहे. यावर बबन गाडगे, सचिन पाचघरे, कविता फसाटे, तारेश बोडखे, सुविद इंगळे,डॉ.हेमंत ठाकरे, मंगेश धूर्वे, प्रकाश वाघमारे, नंदकिशोर जाधव, संजय खरवडे, विजय होळकर, विनोद डोंगरे, विपुल चौधरी यांनी केली आहे
प्रततिक्रिया
धर्मादाय आयुक्त कार्यालयातून संस्था रजिस्टर झाल्याबरोबर पुढील कारवाई करण्यात येईल
सिद्धाप्पा नडगेरी
ता. कृषी अधिकारी आष्टी