Tuesday, June 28, 2022
Homeवर्धासिंदी (रेल्वे) च्या नवीन नगराध्यक्षापदी बबीता तुमाने यांची निवड

सिंदी (रेल्वे) च्या नवीन नगराध्यक्षापदी बबीता तुमाने यांची निवड

मोहन सुरकार

सिंदी रेल्वे : येथील नगर पालिकेच्या अध्यक्षपदाबाबतच्या न्यायालयाच्या निकालाच्या प्रतिक्षेतील सावटाखाली आज सोमवारी (ता.१५)नगरपालीका सदस्यातुन झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुमन पाटील (०४)विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या बबीता तुमाने यांना (१०) मते देऊन नगरसेवकानी नवीन नगराध्यक्षाची निवड केली आहे.


विशेष म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सुमन पाटील या स्वतःच निवडणुकीला गैरहजर राहुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तरी राष्ट्रवादीच्या पाटील यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते आशिष देवतळे यांच्यासह काँग्रेसच्या चार सदस्यानी पाठिंबा दिला. मात्र स्वपक्षीय सुधाकर वलके यांचेच समर्थन न मिळाल्याने खंत व्यक्त करण्यात आली. तर काॅग्रेसचेच शहर अध्यक्ष नगरसेवक प्रकाशचंद्र डफ आणि जयना बोंगाडे या दोन्ही सदस्यांनी तटस्थ राहनेच पसंत केले.
महाराष्ट्रातील विद्यमान सरकार पाहता भारतिय जनता पक्षाला क्षह देण्यासाठी काॅग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळुन काहीतरी मोट बांधतील अशी शहरात चर्चा होती. मात्र, पारपडलेल्या निवडनूकीत कोणाचेही तारतम्य दिसले नाही.
या विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या सर्व सदस्यांनी पक्षावर आपली पुर्ण श्रध्दा दाखवित पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. ऐवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या सदस्याचा सुध्दा पाठींबा मिळविण्यात यशस्वी ठरले.
विद्यमान लोकनियुक्त नगराध्यक्षा भाजपाच्या संगिता शेंडे यांनी कर्तव्यात कसूर केला म्हणून त्यांना नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी १४ नगरसेवकानी घेतलेल्या अविश्वास प्रस्तावावर शेंडे यांना नुकतेच पायउतार केले. याविरुद्ध शेंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेली नविन अध्यक्षाची निवडणूक न थांबविता शेंडे यांना आपले म्हणने मांडण्यासाठी पुढील तारीख दिली आहे.
या पाश्र्वभूमीवर सोमवारी (ता.१५) पारपडलेल्या निवडणूकीत पालिकेच्या १७ सदस्यापैकी १६ सदस्यांनी उपस्थिती दर्शविली. तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीच्या सुमन पाटील या स्वतःच अनुपस्थित राहल्या. तरीसुद्धा त्यांना काॅग्रेसच्या पालिकेतील गटाच्या चारही सदस्यानी हात वरती करुन पाठीबा दर्शविला. तर भाजपाच्या बबीता तुमाने यांना स्वपक्षाच्या ९ तर राष्ट्रवादीचे एक अशा दहा सदस्यांनी हात उंचावून पाठींबा दिला आणि नवनियुक्त अध्यक्षा म्हणून निवड केली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, मुख्याधिकारी अनिल जगताप , प्रशासकीय अधिकारी सिध्देश्वर महाजन आदीनी काम पाहले.
नवनियुक्त अध्यक्षा बबीता तुमाने यांची निवड होताच भारतिय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिशबाजी आणि गुलिलाची उधळण करीत एकमेकांना पेढे भरवित आनंद साजरा केला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular