Tuesday, June 28, 2022
Homeवर्धा'सार्वजनिक बांधकाम विभाग झोपलेले आहे' चे फलक खड्डयात लावून युवा संघर्ष मोर्चाने...

‘सार्वजनिक बांधकाम विभाग झोपलेले आहे’ चे फलक खड्डयात लावून युवा संघर्ष मोर्चाने केले अनोखे आंदोलन.

देवळी: देवळी तालुक्यातील रस्त्याची गंभीर हालत असून नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे.यातच देवळी वर्धा प्रमुख रोडवरील पेट्रोल पंप जवळील अर्ध्या रस्त्यावर खड्डा पडल्याने अपघाताची मालिका सुरू झली आहे.

अनेक अपघात होऊन,प्रशासनाला खड्डा बुजविण्याची मागणी करून सुद्धा खड्डा बुजवित नसल्याने युवा संघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जीवघेणे अपघात टाळण्यासाठी खड्ड्याच्या सभोवताल मोठे दगड ठेऊन चुन्याने आखणी केली जेणेकरून येजा करणाऱ्यांना खड्डा दिसून पडेल.सोबतच त्या खड्ड्यात फलक सुद्धा लावण्यात आले.”जरा जपून,इथे मोठा खड्डा आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग झोपलेले आहे.”या फलकावरील बाबींनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.अधिकाऱ्यांना निवेदने देऊन त्रस्त झाल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केल्याचे युवा संघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.समाजाशी बांधिलकी लक्षात घेता जर दोन दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डा बुजविला नाही तर युवा संघर्ष मोर्चा खड्डा बुजविणार असल्याचे सांगितले.यावेळी युवकांनी रस्त्यावरून येजा करणाऱ्यांना फलक दाखवून अपघात टाळण्यास मदत केली.आंदोलनवेळी किरण ठाकरे,प्रवीण कात्रे,गौतम पोपटकर,गौरव खोपाळ,सुमित झोरे,राम बासू,सागर पाटणकर,मोहित कोसे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular