प्रथमेश किंमतकर रामटेक ते मुक्तागिरी प्रवासाला
कारंजा(घा.):
पर्यावरण वाचवा,सायकल चालवा असा संदेश देत रामटेक ते मुक्तागिरी सायकल प्रवासाला निघालेल्या प्रथमेश किंमतकर, रामटेक या १७ वर्षीय युवकाचे कारंजा घाडगे येथे वृक्षमित्र परिवारचे संस्थापक विलास वानखडे व नागरिकांनी पुष्पमालेने स्वागत व अभिनंदन करीत पुढील प्रवासाला शुभेच्छा व आशिर्वाद दिले.

यावेळी शनशाईन स्कूलचे संस्थापक प्रेम महिले,संजय मस्की,विनोद खोडनकर,राजेश पेटकर,रोशन ढोले,निलेश ढोले पत्रकार सुधाकर बोबडे,विनोद जिवरकर,बाबा किनकर,राजेंद्र
सातभाई,सायकलपटू
प्रथमेशची आई डाॅ.अंशुजा किंमतकर,वडील रूषीकेश किंमतकर व मार्गदर्शक रवी मथुरे उपस्थितीत होते.
या वर्षीचे रक्षाबंधन आयुष्यात लक्षात रहावे आणि बहिणीला आपल्या कर्तृत्वाची भेट द्यावी म्हणून चोवीस तास सायकल चालवून जास्तीत जास्त किलोमीटरचे लक्ष गाठायचे,नवे-नवे स्वतःचेच विक्रम प्रस्थापित करावे आणि त्या अनुषंगाने इतरांनाही प्रोत्साहित करावे ही इच्छा बाळगत सायकल प्रवास सुरू आहे.सायकल चालविणे जितके आरोग्यासाठी लाभदायक आहे मानसिकदृष्ट्या जितके कणखर बनविणारे तितकेच पर्यावरण पुरकही आहे. आतापर्यंत सेवाग्राम, नागपूर, पांढूर्णा, सिवनी,कान्हा किसली,भंडारा येथे येणे जाणे केले आहे. हे सगळं १२ तासात पूर्ण करणारे उपक्रम होते.१६ जुलै ला जबलपूरच्या घाटातून सतत २४ तास सायकल चालवून ४०३ किमी चे अंतर पूर्ण केले.
२१ ऑगस्ट २०२१ ला सकाळी ७ वाजता रामटेक वरून सायकल चालविणे सुरू करून २२ ऑगस्ट २०२१ ला सकाळी ७ वाजता रामटेक ते मुक्तागिरीव मुख्याधिकारी ते रामटेक असा सायकल प्रवास पूर्ण करायचा मानस आहे. या २४ तासात किमान ५०० किमी पेक्षा जास्त अंतर पूर्ण करायचा प्रयत्न राहील. सायकल प्रवास यशस्वी रित्या पार पडावा व समाजात प्रत्येकाच्या जीवनात सायकल हा महत्वाचा घटक बनावा या साठी छोटासा प्रयत्न आहे.
वरील उपक्रम ओएमजी बुक ऑफ रेकाॅर्डस या संस्थेच्या निरीक्षणात करण्यात येणार आहे.
आरोग्य आपले आपल्या हाथी, जेव्हा सायकल होईल आपली साथी असल्याचे प्रथमेशने सांगीतले.