Tuesday, June 28, 2022
Homeवर्धासर्व सेवा संघाच्या अध्यक्ष पदाचा वाद शमविण्यासाठी आबा कांबळे बसले उपोषणाला

सर्व सेवा संघाच्या अध्यक्ष पदाचा वाद शमविण्यासाठी आबा कांबळे बसले उपोषणाला

वर्धा ;

सर्व सेवा संघातील अंतर्गत वाद मिटविण्यासाठी महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे माजी अध्यक्ष तथा सर्वोदयी आबा कांबळे हे सेवाग्राम येथील सर्व सेवा संघ कार्यालयात आज उपोषणाला बसले आहे .


सर्व सेवा संघाच्या अध्यक्ष पदावरून गेल्या वर्षभऱ्यापासून वाद चिघळत आहे .महात्मा गांधीजी च्या विचाराने विधायक कार्यासाठी स्थापन केलेली सर्व सेवा संघात आज दोन गट उभे ठाकले आहे . दोन गटात वादाच्या ठिणग्या पडून वाद पोलिसात गेला आणि आता न्यायालयात गेला आहे .
या सर्व वादावर पडदा पाडण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र बसून मार्ग काढावा, दोघांच्या संमतीने अध्यक्ष ची नेमणूक करावी , तसे अधिवेशन बोलवावे या मुख्य मागणी करीता आबा कांबळे यांनी महात्मा गांधीजी यांच्या शाहिद दिनी उपोषणाला सुरुवात केली आहे .
या उपोषणामुळे गांधीजनात खळबळ निर्माण झाली आहे .
चांदण पाल आणि प्रदीप बजाज हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव विद्रोही यांचा गट बसण्यासाठी तयार असल्याचे सांगितले जात आहे .आत चांदण पाल यांच्या गटाची काय भूमिका राहणार आहे हे येत्या दिवसात दिसणार आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular