Saturday, May 28, 2022
Homeवर्धासमृद्धी महामार्गावरील लोखंड चोरी प्रकरणी तिघांना मुद्देमालासह अटक

समृद्धी महामार्गावरील लोखंड चोरी प्रकरणी तिघांना मुद्देमालासह अटक

▪️सेलू पोलिसांची कामगिरी

सेलू.
तालुक्यातील सुरगाव शिवारातील समृध्दी महामार्गावरील लोखंड चोरी प्रकरणी गुन्हयाचा छडा लावत तिघांना मुद्देमालासह अटक करण्यात सेलू पोलिसांना यश आले आहे.


सुरगाव शिवारातील समृध्दी महामार्गावरील लोखंडी साहीत्य अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याचे उघडकीस आले याबाबत फिर्यादी राहुल मुदककर यांचे तक्रारी नुसार मंगळवारी 24 ला सेलू पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला. ठाणेदार सुनील गाडे यांचे मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी अखिलेश गव्हाणे, नारायण वरठी, सचीन वाटखेडे, कपील मेश्राम यांनी मिळालेल्या गोपनिय माहितिचे आधारे तिघांना ताब्यात घेत याचा छडा लावला या तिघांनी गुन्हयाची कबुली देत समृध्दी महामार्गावरील कँश बेरीयम चे कामावरील नटबोल्ट चे 50 किलो च्या चार थैल्या ,गे नाँलेज लोखंडी धातू प्रती बँग 7500 प्रमाणे जुमला किंमत 30 हजार रूपयांचा माल हस्तगत केला तसेच गुन्हयात वापरलेली होंडा कंपनीची एक मोटरसायकल किंमत 50 हजार असा 80 हजाराचा माल जप्त केला असून आकाश मधुकर डोंगरकर वय 24 रा. गोंदापूर दयाल अनिल माहुरे वय 19 मोर्चापुर, शिवम सुधाकर आरडे वय 20 सहारा पार्क सेलू . यां तिघांना सेलू पोलिसांनी अटक केली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular